पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

3 the time during which a flash as visible, an instant क्षण m, पळ n, घडी f, निमिष n, चक्क होण्यास लागणारा काळ m. F. v. i. to break forth with a sudden & transient light चमक मारणे, चमकणे, चकचकणे, चकाकणे, लकलकणे, लकाकणे, झगमगणे, झकझकणे, (वीज इ०) लवणे. २ to show a momentary brilliancy झक होणे, चक्क होणे. ३ to break out violently, to rush hastily, to burst forth खाडकन् जोराने बाहेर पडणे, जोराने आंत शिरणे. F. v. t. to send out in flashes, to cause to burst forth with sudden light झकदिनी चकाकवणे चमकवणे. २ to light up as by a sudden flame or light एकदम-शदिनी पेटविणे, वरवर झकपक करणे. ३ to tricks up in a showy manner (लुच्चेगिरीने किंवा युक्तीने) भपकेदार दिसेल असें करणे, चकचकीत करणे, झक करणे. To F. in the pan (a gun) रंजुक रंजक पिणे उडणे. २ ( colloq.) to fail of success अपयश येणे. F. a. showy but counterfeit, cheap, pretentious & vulgar दिखाऊ, स्वस्त, नकली, भपकेदार पण खोटें, हलका; as, “ F. finery." २ wearing showy counterfeit ornaments, vulgarly pretentious खोटे नकली दागिने घालणारा, हलकट भपका करणारा, नीच; as, "F. people." Flash-house n. वेश्यागृह n. Flash-wheel n. जुन्या आगबोटीला लावण्याचा फळ्यांचा रहाट m. Flashily adv. Flashiness n. (विजेसारखा)क्षणिक झकझकीतपणा m, चकचकीतपणा m, भडक f. २ बाहेरचा भपका m, क्षणिक गोजरेपणा m. Flashy a. dazzling for a moment, transitorily bright थोडासा वेळ चमकणारा, चक्क होणारा, झक होणारा. २ fiery, vehement झगझगीत, तापट, रागीट, कडक, उग्र, तामसी, गरम; as, "A temper always F." ३ showy, gaudy दिखाऊ, लकलकीत, लक, लकालक, झळक, भडक, भडकीचा, ढबदार, भळभळीत, बभूक, थाटमाटाचा. ४ without taste or spirit नीरस, आवेशशून्य. Flashing point स्फुरणबिंदु m. ज्या उष्णमानावर तेलांतून ज्वालाग्राही वाफ निघून ती व तेल पेढू शकतात, त्या उष्ण मानास स्फुरणबिंदु flashing point असे म्हणतात.
Flask (flask ) [A. S. flasce; Ger. flasche from L. L. flasco - L. vasculum, a flask.] n. a small bottleshaped vessel for holding fluids शिशी f, बाटलीf, कुपी f; as; “F. of wine." २ a narrow-necked vessel of metal or glass (कांचेचे किंवा धातूचे) बाटलीसारखें भांडे n. ३ ( Founding ) ओतकामाची पेटी f. Flask'let n. ( Eng. ) a long, shallow basket, with two handles लांब व उथळ टोपली f. २ a small flask लहान कुपी f.
Flat ( flat ) (M. E. flat-Icel. flatr-Swed. flat-Dan. flad.]a.level without inclination, plans सपाट ,समान, सारखा, सम, चढणीउत्तरणीशिवायचा, पाणसाळ. २ a level with the ground or earth, lying at full length or spread out upon the ground भुईसपाट,