पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपयोग भुतें भारण्यास किंवा देवता सिद्ध करण्यास करितात अशी वस्तु f, जारणमारणाचे कामी लागणारी साधने n. pl. (जसें, मणि m, औषधि f, पाषाण m, वनस्पति f, अस्थी f, नरकपाल n, करोटी f.) ३ any object to which one is excessively devoted आवडीची प्रेमाची-भक्तीची वस्तु f, स्तोम माजविलेला मनुष्य m. वस्तु f. Fe'tichism, Fe'tishism n. the doctrine or practice of belief in fetiches फेटिशिओपूजा f; मंतरलेल्या किंवा भारलेल्या किंवा दैवी म्हणून मानलेल्या वस्तूंची पूजा f, मण्योषध्यादिपूजा f (दैविक अद्भुत शक्तींचे अधिष्ठान किंवा साधन म्हणून मानलेल्या) मणि, मंत्र, यंत्र, औषधि, पाषाण, वृक्ष, ताईत, दोरे, अस्थि, दंत, कपाल, योद्धयांची, किंवा वीर पुरुषांची चिलखतें इत्यादि नैसर्गिक किंवा कृत्रिम जड वस्तूंचा संग्रह किंवा आराधना करण्याचा संप्रदाय, वर दिलेल्या जड वस्तूंस अद्भुत शक्तींचे अधिष्ठान किंवा साधन समजून त्यांची पूजा करण्याचा प्रघात. हा प्रघात. आफ्रिकेंतील गिनीदेशाच्या लोकांत पोर्तुगीज लोकांस प्रथम आढळला तेव्हां त्यांनी त्यांच्या त्या पूजनीय जडवस्तूंस फेटिशिओ हे नांव दिले. २ excessive devotion to one object or to one idea, blind adoration अमर्याद -अतिशय भक्ति f, अंधश्रद्धा f, नाद m, छंद m. ३ abject superstition मूढ विश्वास m, अंधभक्ति f. Fe'tichist, Fetishist n. a believer in fetiches मणि, औषधि इत्यादि भारलेल्या वस्तूंवर श्रद्धा असणारा m. Fetichis tic, Fetishis tic a. Pertaining to or involving fetichism भारलेल्या किंवा दैवी मानलेल्या वस्तूंच्या पूजेसंबंधी. फेटिशिओ हा शब्द पोर्तुगीज भाषेतून घेतला आहे.
Feticide ( fe'ti-sid or fet'i-sid) [ Felus, & L. cedere, to kill.]n. ( med. & law. ) the act of killing the fetus in the womb, the offence of procuring an abortion ( written also Faticife ) भ्रूणहत्या f, गर्भपात m,, गर्भपात करण्याचे पातक n गुन्हा m.
Fetid ( fet'id or fē'-tid ) [ 0. Fr. fetide-L. fetidus, foetidus, stinking-L. fetere, to stink.] a. having an offensive smell कुजट, वासट, घाणेरा, घाणेरडा, वाशेला, घुरट, दुर्गधियुक्त, उग्रगंधि, उग्रट. Fetidity, Fetid'ness n. घाण f, घुरटाण f, ओरढाण f, दुर्गध m.
Fetlock ( fet'-lok ) [ From root of Fook & Lock, as in Lock of hair. O. E. fetlak, flock. cf. Icel. fet, pace. See Foot. ] n. the cushion like projection, bearing a tuft of long hair on the back side of the leg above the hoof of the horse and similar animals झुलूप असलेला नेवराबाहेरचा पुढे आलेला भाग m, (loosely ) नेवर m. २ the joint of the limb at this point ( between the great pastern bone and the metacarpus ) (a) the luft of hair hat (सांधा) m. () नेवरावरील केश m pl. झुलुप n.
Fetter (fet'er) [ A. S. fetor, shackle for the feet. cf. L. pedica, a fetter.] (Gen, pl.)n . chain try which |