पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अगडबंब, अगडधू, बोका, बोंगा, मोधळा, भोपळ्यारोगी, पेजपात्र, लोध, लोधा, लोधडा, आधोड, ढब्बू, तोळंबा, ढोल.) F. and happy तुष्टपुष्ट, हृष्टपुष्ट, तुंद. To become F. and flabby कापूस सवंग करणे (fig.), कापूस स्वस्त होणें (An) g. of. s., कापुसणे, बेंबीचे उखळ n. होणे g. of. s., मेणn. पडणें (fig.)g. of. s. To get F. पोसणे. To get F. and saucy माजणे, मातणे, मस्तीस येणे, उद्यानास येणे.](b) oily, unctuous, rich ( said of food ) चिकण, स्निग्ध, स्नेहाळ, ओशट, चमचमीत, घमघमीत, कसदार, सत्वशील, पौष्टिक. २ coarse, dull, stupid जड, मंद, मूर्ख, मंदबुद्धि, जडधी, ठोंब्या. ३.fertile, productive सुपीक, पिकाऊ, चिकण, चिकणवट, बहुफलप्रद, कसदार, रसाळ ; us, "A fat soil. ४ producing a large income, desirable मोठ्या पगाराची-वेतनाची (नोकरी), पुष्कळ उत्पन्नाची. ५ typog. Of a character which would the compositor to make large wages ( said of matter containing blank, cuts, or many leads, etc.) (ज्यांत ठसे जुळविणाराला) पुष्कळ मजुरी पाडतां येते असा (मजकूर इ०); as, " A fat page." F. s. t. (Shakes.) to make fat, to father लठ्ठ करणे, माजवणे, पुष्ट करणे; as, "To fat sheep.” F. v. i. to grow fat लठ्ठ फुगणे, माजणे, आडवा तिडवा फुटणे. F. n. चरवी f, मेदm, वसाf. २ the richest production, the best Part तत्वमसीf, मलईf, परिपाकm, सारn, इत्यर्थ m, उत्तमांशm, लोणी n (fig.).३ typog. (ठसे जुळविणान्याच्या) किफायतीचा मजकूर n. Fatting pr. p. & v. n. Fatted pa. b. & pa. p. Fat'-brained a. (Shakes.) dull of apprehension मंदबुद्धि,धृतबुद्धि, मठ्ठ, जेनवुद्धि, बुरणुसबुद्धि ( colloq. ). Fat'-kidneyed a. gross . Fatling n. a young animal fattened for slaughter ( said of such animals as are used for food) (खाण्याकरितां मारण्यासाठी) पुष्ट केलेलें. पोसलेलें जनावर n. F. a. small and fat गुबगुबीत, लटलुटीत. Fatly adv. grossly गुबगुबीतपणाने. Fatness n. quality or state of being fat लठ्ठपणा, स्थूलत्वn, पुष्टताf, मेदोवृद्धिf, मांसलत्वn. २ (hence) freshness, fertility, fruit fitness सुपीकपणा m, फलदायकाव n , स्नेहाळपणाm, कसm, जोमm. ३that which makes fertile चिकणाईf, बहुफलप्रदत्व लठ्ठपणा n. Fatty a. चिकण, स्नेहाळ, कसदार, ओशट, वसामय, चरबीचा, चरबीनं भरलेला. [FATTY DEGENERATION वसामय विकृति एखाद्या इंद्रियांचे आंगचा तेलाचा मुख्य भाग हळूहळू नाहीसा होऊन त्या ठिकाणी चरबी तयार होणे n. FATTY LINER OR IIEART हृदय, यकृत वगैरे इंद्रियांना वसामय विकृति होणे n. FATTY INFILTRATION वसासंचय m, एखाद्या इंद्रियांत चरवीचा संचय होणे n. FATTY TUMOR. वसाग्रंथि, चरबी, आवाळू.] Fattiness n. Fattish a. काहींसा लठ्ठ Fatten v. t. to make fat, to feed for slaughter CIAणे, पुष्ट-ताजा-दुलदुलीत, &c. करणे, भरवणे or आंगाने भरवणे. २ to make fertile and fruitful, to enrich सु.