पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होणा-या इंग्रजी शब्दांत नेहमीच्या व्यावहारिक शब्दांचाच भरणा फार आहे. तसेंचF ने प्रारंभ होणान्या इंग्रजी शब्दांत अनुकरण. वाचक शब्दहि बरेच आढळतात; जसें, fizz, flat, flap, flash, flip, flush, fuzz.
Fa (fa) [ It. ] n. mus. (a) a syllable applied to the fourth tone of the diatonic scale in solmization शुद्धस्वरसप्तकांतील चवथ्या (मध्यम) स्वराचं इतालियन लघु संज्ञाक्षर n, फा. (b) मध्यमस्वर m.
Fabaceous ( fa-ba.'-shus) [L. fabaccus -faba, bean.] a. having the nature of a bean, like a bean वाला. सारखा, पावट्यासारखा, फरसबीसारखा. Fabacee n. pl. the bean tribe वालाची जातf.
Fabella (fa-bel'-lä) [L. dim. of faba, a bean. ]n. Fabellæ pl. anat. one of the small sesamoid bones situated behind the condyles of the femur in some mammals (काही जनावरांत मांडीचे हाडाचे खालचे टोकाजवळील) टेंगळांचे मागील बाजूस वाढणारे हाड n,मापास्थि n. (माप=a kind of bean.)
Fabian (fā'-bi-an) [L. Fabianus, l'abius, be longing to Fabius.]a. of, pertaining to, or in the manner of, the Roman general, Quintus Fabius Maximus Verrucosus ; cautious ; dilatory; avoiding a decisive contest फेबिअससारखा, सावध व धोरणी, वेळ लावणारा, उशीर करणारा, सावध व आस्ते आस्ते काम करणारा. Fabian policy सावधपणे व आस्ते आस्ते काम करण्याचे धोरण n. रोमन सेनापति फेबिअस हा आपला शत्रु जो हानिबाल त्याच्याशी समोरासमोर गांठ घालन युद्ध न करितां त्याला नानाप्रकारे हुलकावण्या दाखवून व त्यावर अचानक छापे घालून त्याला हैराण करीत असे व त्याचे काही चालू देत नसे. ह्या त्याच्या काव्यास फेबिअन कावा म्हणतात.
Fable ( fa-bl) [Fr.fable -L. fabula, a story-fari to speak.] n. a feigned story or tale, intended to in. struct on amuse (बोधपर) कल्पित गोष्ट -ि कथाf . २ the plot, story, or connected series of events, forming the subject of an epic or dramatic poem ( कल्पित) कथानकn , कथावस्तुf , संविधानक n. ३ any story told to excite wonder, the theme of talk नवलाची गोष्ट f, नवलn , सर्वतोमुखी-सासुखी झालेली गोष्ट f, अद्भुत कथा f; कहाणीf , सामान्यवार्ता f, बोलवा f. ४ fiction, untruth, falsehood गप्पf, खोटी गोष्टf, कंडीf, थापf. F:v.i. to compose fables कल्पित गोष्टी लिहिणे. २ to write or speak: fiction, or what is note true काल्पनिक कथा-गोष्टी लिहिणे-सांगणे, थापा मारणे-देणे-ठोकणे; as, " He fables not." F. v.t. (Hilton) to feign, to invent, to tell of falscly (-च्या) संबंधाने मिथ्या-लटके-खोटें सांगणे, कल्पित वर्णन करणे; as, “ The hell thou fablest." Fa'bler n. कल्पित गोष्टी लिहिणारा. २ (खोट्या) कंड्या पिकविणारा. Fa'bled pa. t. & pa. p. कल्पित कथांमध्ये वर्णन केलेला-सांगितलेला, दंतकथेतील-संबंधी. Fa'bling pr.