पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

F (ef) इंग्रजी वर्णमालेतील सहावें अक्षर आणि चवथें व्यंजन या अक्षराचा आकार व उच्चार लॅटिन भातून घेतला आहे है अक्षर प्रथमतः वहुधा मिसरलिपीतून फिनिशिअलिपीत, तीतून नंतर ग्रीक लिपीत व ग्रीकमधून लॅटिः लिपति, व लॅटिनमधून इंग्रजीत असें संक्रमण होत आले आहे. व्युत्पत्तिदृष्टया 'ह्या इंग्रजी वर्णाचाP, k, v, & b ह्य व्यजनांशी निकट किंवा सपिंड संबंध आहे; जसे, इंग्रजी Five=ग्रीक Pente=संस्कृत पंचन; इंग्रजी wolf=लॅटिन lupus= संस्कृत वृक; इंग्रजी.f0x = लॅटिन vixen; इंग्रजी break =लॅटिन.fragilis. F ह्या इंग्रजी व्यंजनाचा उच्चार, मराठी फ ह्या अक्षराने बरोबर दाखवितां येत नाही. तथापि खालचा ओठ वरच्या दांतास लावून मराठी फ या व्यंजनाचे उच्चारण केल्यास तो उच्चार बहुतांशी इंग्रजी या उच्चाराशी जुळतो. इंग्रजी व मराठी उच्चारांत अशा सताचा किंचित् भिन्नता असल्यामुळे मराठी फ इंग्रजीत लाहताना या अक्षराचा उपयोग न करितां त्याऐवजी ph अशा दोन व्यंजने लिहितात. २ math. a symbol to denote anything occupying the sixth place in a series सहाव्या स्थानाचे दर्शक चिन्ह n. फ (अ ब क ड इफ).३ mus, F is the name of the 4th note of the diatonic scale of C major शद्धस्वरसप्तकांतील चवथा स्वर m (मध्यम ). ४ f stands for Frederic, Fanny &c फ्रेडीक , फैनी वगैरे फकाराने प्रारंभ होणाऱ्या इंग्रजी विशेषनामांचा संक्षेप म्हणून या अक्षराची योजना करितात. तसेंच F. G. S., F. R. S, F. T. S. इ० पदव्याच्या संज्ञाक्षरांत F हैं अक्षर Fellow या शब्दाबद्दल लण्याचा प्रघात आहे. रोमन क्याथोलिक पंथाचा प्रीस्ट (father) ह्या पदवीचा संक्षेप म्हणूनही F या अक्षराचा उपयोग केला जातो. Fahrenheit ह्या शब्दाबद्दल व्यवहारात F हा वर्णच घालण्याची वहिवाट आहे. ५ F. A. A. or f. a. a. या संज्ञाक्षरांचा अर्थ व्यापारी भाषेत free of all average व F. O. B. ह्या संज्ञेचा अर्थ free on board 'माल गलबतावर चढला म्हणजे रवाना करणारा मोकळा' असा आहे. ६ naut. f stands for 'Fog' and ff stands for thick fog' नौकाशास्त्रांत f= धुके व ff= दाटधुके असा बोध होतो. ७ f stands for fine in the distinctive mark of a particular description of black lead pencil काळ्या लांकडी पेन्सलीवरील हा वर्ण fine = उंची अशा अर्थाने योजला असतो.८ chem. f stands for fluorine रासायनिक भापत फ्ल्युओरीन ) प्लव हा शब्द f या संज्ञेने दर्शवितात. [THE THREE F'S ARE FAIR RENT, FIXITY OF TENURE,& FREE SALE वाजवी धारा, निरंतरचा वाहणीहक्क, आणि विक्रीचा पूर्ण हक.] F या अक्षराचा रोमन आंकड्यांत (४०) चे जागा आणि F या अक्षराचा ४०००० या आंकड्याबद्दल उपयोग करण्याची पूर्वी पद्धति असे. N.B.-A, B, C, D, आणि E ह्या पहिल्या पांच अक्षरांतील पटन व ग्रीक भाषांतून आलेले शब्द बहुधा वाङ्मयाभाषिक, किंवा शास्त्रीय असे आहेत. परंतु F ने प्रारंभ

           89