पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

performs, a doer (कार्य) करणारा, कर्ता. २ law. the person appointed by a testator to execute his will or to see its provisions carried into effect, after his decease मृत्युपत्र बजावणारा, मृत्युपत्राबरहुकूम व्यवस्था करणारा, मृत्युपत्रव्यवस्थापक. Exec'utress, Exec'utrix n. fem. Executorial a. Executorship n. मृत्युपत्र. व्यवस्थापकाचा अधिकार m, (मृत्युपत्र) बजावणान्याचा अधिकार m. Executory a. pertaining to administration or to putting the laws in force, executive अंमलबजावणीसंबंधी. २ law. designed to be executed or carried into effect in lime to come, or to take effect on a future contingency भविष्यकाळी अमलात आणण्याकरितां योजलेला.
N. B.---Execute=बजावणे, अमलांत आणणे. Perform = यथाविधि करणे, करणे. Achieve = उत्तम रीतीने पार पाडणे.
N. B.---Executor हा मृत्युपत्राने नेमलेला असतो व एखादा मनुष्य मृत्युपत्र केल्याशिवाय मेला असला तर त्याच्या जिनगीची व्यवस्था करण्याकरितां कोर्टाकडून नेमला जाणाऱ्या व्यवस्थापकाला Administrator असे म्हणतात.
Exegesis (ekse-jē'-sis ) [Gr. exegesis-eregcomai, to explain-ex, out & hegeomai, to guide,-L. agere, to lead.] n. exposition, explanation, esp. of the scriptures स्पष्टीकरण n, विवरण n, व्याख्यान n, अर्थबोध m, टीका F. Ex'egete, Exege'tist n. one who interprets the scriptures धर्मग्रंथाचे विवरण करणारा m, टीकाकार m. Exeget'ic, Exeget'ical a. Pertaining to exegesis, explanatory विवरण करणारा, स्पष्टउघड करणारा, टीकात्मक, स्पष्टार्थबोधक. Exege'tically adv. Exegetics n. pl. the science of exegesis विवरणशास्त्र n.
Exemplify (egʻzem-pli-fi)[ L. exemplum, example & facere, to make; of. L. L. exemplificare, to copy, serve as an oxainple.] v. t. to show or illustrate by example उदाहरणाने दाखविणे, दाखला दृष्टांत देऊन सिद्ध करणे. २ to copy नक्कल करणे. ३ to show by an attested copy सहीच्या नकलेनं साक्ष देणे..Exem'plified pa. t. & Pa. P. दाखल्याने स्पष्ट केलेलें. Exemplifica'tion n. दाखला देणे n, दृष्टांतानें समर्थन करणे n. २ द्योतकदर्शक गोष्ट f. Ex'emplary a. serving as a pattern, worthy of imitation कित्त्याचा, अनुकरणीय, कित्ता घेण्याजोगा, दृष्टांतास योग्य, अनुकरण करण्यास योग्य, अनुकार्य, अनुसरणार्ह, अनुकरणार्ह, उत्तम, भला, कित्ता घेण्यास योग्य, दाखला घेण्याजोगा. २ serving as a warning, monitory दहशत-धाक-जरब बसावयाजोगा, धडा घालून देणारा, उदाहरण घालून प्रतिबंध करणारा, जरबेचा. ३ illustrating as the proof of a _thing उदाहरणीय, दृष्टांतादाखल.
Exempt (eg-zemt' ) [ O. Fr. cxempt, whence exempter, to exempt, free-L. exemptius, p. p. of eximere, to take out, «deliver, free-L. ex, out & emere, to take. या शब्दाचा मूळ अर्थ वेगळा करणे,