पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शांतवणें n, शम m, उपशमन n, उपशम m, प्रशम m, state.शम m, उपशम , प्रशम m, शांति , उपशांति f. Aller'iator , ज्याचे योगानें उपशम होतो तें, उपशमन करणारा. Alle'viative a. उपशामक n, उपशामक वस्तु f. Alleviated p. उपशांत, प्रशांत, शांत.
Alley (al'li ) [L ad, to, & akre, to svim.] n. walk in a garden बागेंतील रस्ता m-वाट f, उपवनमार्ग m, आराममार्ग m, (बागेंतील) पायवाट f. २ (of towns, &c.) अळी f, आळ f, गल्ली f. ३ छापखान्यांतील खिळे जोडणारे ( compositors) यांच्या दोन रांगांमधील जागा f. All'eys pl.
Alliance (al-lians) see Ally.
Alligation (al-li-ga'sbun) [ L. ad, to, & ligare, to bind.] n. arith.-मिश्रगणित n, सुवर्णगणित n, एका जिनसाच्या निरनिराळ्या जातींचे निरनिराळे दर असतां ते घेऊन त्यांच्या मिश्रणाचा अगर अनेक जिनसांच्या दरांच्या मिश्रणाचा एकंदरीचा दर काढणें n.
Alligator ( al'li-gā-tur) [L. lacerto, a lizare.] n. zool. सुसर f, मकर m, (pop.) मगर m, सुस्वर f, मगरमच्छ m, कुभीर , नक (f) m, गोधा f. dim. गोधिका f. Grasp or seizure of an A मगरमिठी f.
N. B. Alligator आणि crocodile ह्यांला निरनिराळे मराठी शब्द योजणें फार कठीण आहे.
Alliteration (al-lit-er-a'shun) [L. ad, to, & litera, a letter] n. प्रास M, अनुप्रास , श्रुत्यनुप्रास m, एका मागून एक येणा-या शब्दांचे आरंभीं एकाच अक्षराची पुनरावृत्ति f, वरचेवर तेच तेच वर्ण येणें; as, Round and round the rugged rascal ran. Alliteral a. प्रासयुक्त. Allit'erate v.i. प्रास होणें, प्रासांत असणें. Allit'erative a. pertaining to, or consisting in A. अनुप्रासासंबंधीं, अनुप्रासमय, अनुप्रासबद्ध. Allit'erativeness n. अनुप्रासयुक्तता f. Allit'erator n. अनुप्रासक m, अनुप्राश्या (यमक्या शब्दाप्रमाणें).
Allocate ( al'lo-kāt) [L. ad, to, & locare, to place.] v. t. देणें, वांटून देणें. २ विशिष्ट कारणासाठीं निराळा काढून ठेवणें. ३ विभागून-वांटून देणें (shares in a public company or the like). Allocā’tion n. वांटणी f.
Allodial (al-lb'di-al ) a. law स्वाधिपत्याचा, अनन्याधिपत्याचा, स्वसत्ताक, स्वस्वामिक, पूर्णसत्तात्मक, ज्यासंबंधीं सर्व प्रकारचे हक्क स्वतःकडे असतात असे (opposed to feudal ).
Allodium ( al-lo'di-um ) [ Low L. allodium. ] n. law. freehold estate स्वससाक-स्वाधिपत्याचें-&c.-क्षेत्र n वतन n-&c., पूर्णपणें आपली सत्ता असलेली स्वतंत्र जहागीर f. (opposed to 'feud. ') Also Allod, Alod.
Allopathy ( al-lop'a-thi) [ Gr. allos, other, & pathos, morbid condition.] n. विषमचिकित्सा f, प्रतिचिकित्सा f, व्याधिविपरीत चिकित्सा f, भिन्न अगर उलट स्थिति होईल अशा प्रकारें औषधोपचार करून व्याधिनाश करण्याची पद्धत f,(opposed to homeopathy