पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

doctrines ख्रिस्त व त्याची मते ह्यांच्या संबंधाची सुवार्ता सांगणारा. an itinerant missionary preacher फिरता शुभवर्तमानोपदेशक m.३a writer of one of the Four gospels (चार शुभवर्तमानांच्या ग्रंथांपैकी कोणत्याहि ग्रथाचा )शुभवर्तमान लेखक m. ४ a travelling preacher whose efforts are chiefly directed to arouse to immediate repentance (मनाची वृत्ति एकदम) पश्चात्तापानुकूल करणारा उपदेशक m. Evan'gelistary n. a selection of the passages from the gospels (ख्रिस्ती लोकांत ईश्वरोपासनेच्या वेळी म्हणण्याकरिता) शुभवतेमानाच्या चार पुस्तकांतून काढलेले वेंचे m. pl., शुभवर्तमानसारसंग्रह m.
Evaporate (e-vap'-o -rat ) [ L.e, off v aporo-atum -vapor, vapour. ] v. i. to fly off in vupour बाष्परूपाने उडून जाणे, वाफ होऊन उडणे, वाफ होऊन आटणे. सुकणे, वाफ होणे, बाष्पीभवन होणे. २ to pass into an invisible state अदृश्य होणे, नाहींसा होणे, वाळणे. ३ to be wasted, to be dissipated, to escape without effect ( परिणाम न होतां) व्यर्थ-वांया जाणे. E. v.t. to convert into steam or gas बाष्पीभवन करणे. बाष्प करणे, वाफ करणे. २ to expel moisture from, leaving solid portions(जड पदार्थ ठेऊन) द्रव पदार्थ नाहीसा करणे (सुकवून-वाळवून-कृत्रिम उष्णतेने) पदार्थातील आद्राता कमती करणे. Evap'orable a. वाफ करतां येण्याजोगा, उडुन दवडता येण्याजोगा. Evaporation n.the process by which any substance is converted from a liquid or solid state into, and carried of as vapour बाष्पीभवन n, बाष्पीकरण n. २ the transformation of a portion of a fluid into vapour बाष्पीभवन n , बाष्पीकरण n , वायुरूपाने उडून जाणे n , वाळणे n, आळणे n. ३ that which is evaporated, vapour बाष्प n, वाफ f, वाय m. Evap'orator n.बाष्पीभवणीय Evap'orator n. बाष्प करणारा, द्रवांश ओला भाग नाहीसा करणारा.
Eve, Even (ēv,ēv'n) [M. E. euen (even). A. S. æfen Dut even. Dan, jævn Swed. jamn. ] n. (poetic) evening सायंकाळ f, m, प्रदोषसमय m, अस्तमान m. २ the period preceding some important ecent प्रारंभ m, सुरुवात f, आदल्या दिवसाची संध्याकाळ f . यहुदी लोक आपल्या दिवसाचा प्रारंभ प्रदोषकालापासून होतो समजतात, अर्थात् त्यांच्या कल्पनेप्रमाणे अलंकारिक भाषेत प्रदोषकाल ( eve) हा आरंभाचा वाचक शब्द होतो, व यहुद्यांचेंच धर्मशास्त्र युरोपियन राष्ट्रांनी घेतले असल्यामुळ, ते जरी मध्यरात्रीपासून दिवसगणना करतात. तरी यहुद्यांप्रमाणेच ( eve) शब्द आदल्या दिवसाची सध्याकाळ द्या अर्थी मानतात; as, "On the E. of death,” The Eve of Christmas दखिस्तमसची आदली संध्याकाळ f, खिस्तमसचा आदला प्रदोषकाळ m.
Even (e'vn) [ A. S.efen; Dut even; Ger. eben-ebene, to make smooth, perhaps allied to L. aquus,