पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

its removal (as in dangerous delivery) गर्भ m, मूल ( colloq.) कापून काढणे n, (बाळंतीण अडली असतां) (अडलेल्या बाळंतिणीची सुटका करितांना), गर्भछेदन n. Em'bryotroph n. biol. the material from which the embryo is formed & nourished ज्याच्यापासून गर्भोत्पत्ति व गर्भपोषण होते असे द्रव्य , गर्भद्रव्य n.
Emend ( e-mend') [ L. emendare-e, out of & men da, mendum, a fault, a blemish. Amend & Mend are virtually the same as Emend. ] v. t. to remove faults or blemishes from, to purge of faults, to make better (चे) दोष काढून टाकणे-नाहीसे करणे. घालविणे-दूर करणे, सुधारणे, (ची) सुधारणा करणे, निर्दोष-शुद्ध करणे. २ to make corrections (in a literary work ), to improve the reading of ( as an emended text of Shakespeare) शुद्ध करणे, (ची) शुद्धि करणे, तपासून सुधारणे शुद्ध करणे, शोध घालणे, पाठशद्धि करणे. Emendation no-the act शुद्ध करणे n, शोध m, शोधन . २alteration by editorial criticism, as of a text so as to give a better reading शोध m, पाठसूचना f, शुद्धि f, दुरुस्ती f. ३ . removal of errors or corruptions from a document शुद्धि f, शोथ m, दुरुस्ती f. Emendator n. शोधक. २ टिप्पणीकार m. Emen'datory a. शुख-निर्दोष कर. णारा, दोष काढून टाकणारा. Emender a. दोष काढून टाकणारा, शोधक.
N. B. Amend सुधारणे. Emend निर्दोष करणे.
Emerald ( em'-er-ald ) [Fr. emeraude, Span. esmeralda. L. smaragdus.-Gr. smaragdos, an emerald. cf. Sk. मरकत.] n. min. a precious stone of a rich green colou° पाच, गरुडपाच, मरकत m, राजनील m, पनग pop. पन्ना m, हरिन्मणि m, अश्मगर्भm. २print. टाइपाचा एक प्रकार m. E. a. मारकत, मरकतसदृश, जंबुर्दी; as, "E. meadows." Emerald green हिरवट टिकाऊ रंग m, मरकती रंगm, पाचेसारखा हिरवा रंग m. Emerald Isle आयलंड बेटास दिलेले एक नांव n. त्या बेटांतील गर्द व हिरव्या चार झाडीच्या रंगावरून त्यास हे नांव पडले आहे.
Emerge (ē-meri') [ L. e, & mergere, mersum, to dip, to plunge. See Merge. ] v. i. to rise out of a Auid, to issue and appear (प्रवाही पदार्थातून-पाण्यां. तून) वर येणे-निघणे, उदय पावणे, दृष्टीस पडणे, दृष्टिगोचर होणे, उदय m-उन्मजन उद्गमन 1 -पावणे with g. of a.; as, “ To E. from the water or the ocean; The sun E.s from behind the moon in an eclipse." २.to emerge from poverty or obscurity डोके वर काढणे, करणे, उदय होणे g. of s., उदयास येणे, पुढे येणे, (fig.)g. of s., नांवारूपास येणे, अभ्युदय पावणे; as, “Those who have emerged from very low, some from the lowest, classes of society.” Emer'gence n. pl. Emer'gences the act of sudden uprisal or appearance (अकल्पित) वर येणे n, उदय m, उन्मजन