पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Aliquant (al'i-kwant) [L. aliquantum, somewhat, alias, another, & quarrels, how great.] a. arith. सशेषभाजक, जिनें दुसन्या रकमेस मागिलें असता शिल्लक रहाते ती (संख्या).
Aliquot (ol'i-kwot) [L. aliquot, some, several, alive, another, & quot, how many. ] a. arith. अशेष भाजक, जिनें दुसऱ्या रकमेस भागिलें असतां शिल्लक राहत नाही ती (संख्या).
Alive (a-liv' ) [ Prep. a, on, & Like.] a. जिता, जीवंत (Pop. ) जिवंत, जिवा, सजीव, सप्राण, सचेतन. २ active, in ful being-vigour-virtus, &c. जिता, जागता, चालता, जागृत, जागरूक, सतेज. [ALL A. alite and her: !: जिता जागता, जिता जिवंत, धडपडीत जिवंत.] ३ lively, swarming गजबजीत; as, The city was A. ४ आनंदी, उल्हासी, as, A. with excitement. ५ मर्मज्ञ, गुणग्राहक; as, A. to the beauties of nature. Used always after its noun.
Alizarin (a-liz'a-rên) [Fr. alizari, an Eastern name of madder. ] n. chem. अलिॉरीन् नांवाचा तांबडा रंग m (अलीकडे कापसास तांबडा रंग देण्याकरितां याचाच उपयोग करितात). २ med मंजिष्ठांतील रक्त-द्रव्य-तांबड़े द्रव्य n.
Alkahest (al'ka-hest) n. सर्व धातूंचे किंवा वस्तूंचें पाणी करणारा पदार्थ m, सर्वद्रावक n. Alks-hest'ic a.
Alkali ( al'ka-li ) [Ar. al-quliy, ashes.] n. chem. कल्याब m, आल्कली m, अम्लप्रतियोगी m, (दाहक) क्षार m(according to Prof. Roy), खार m, योगवाही (O.f, m, कलिभस्म पोट्याशभस्म, अम्लाच्या (आसिडाच्या) योगानें ज्यांचे क्षार बनतात अशा पदार्थ्याच्या वर्गांपैकी एक मुख्य वर्ग m. या पदार्थाच्या योगानें पिवळी हळद (turmeric) तांबडी किंवा बदामी होते व अम्लानें तांबडा केलेला litmus कागद निळा होतो. ह्यांना दाहक धर्म असतात. Caustic Soda, Caustic potash हे तीव्र आल्कली आहेत. Al'kalies or Al'kalis pl. Alkales'cency n. आल्कलीसारखें होण्याचा गुण m. Alkales'cent a. Alkalig'enous a. आल्कलीजनक. Alkalim'eter n.आल्कलीमापक (यंत्र)n. Alkalim'etry n. पृथक् आल्कली मोजण्याची विद्या f. आल्कलीमापनशास्त्र n, आल्कलीमिति f. Alkaline a. कल्याबाच्या मुख्य तत्वाचे (Alkali चे) गुण ज्यांत आहेत असा (पदार्थ), कल्याबाच्या गुणाचा, कल्याबधर्मक, कल्याबगुणी, कल्याब. गुणक. A. ashes आल्कलीरक्षा. Alkalino earths पार्थिव-क्षार-आल्कली. Alkalin'ity n.operaatf. Alkalise v.t. कल्याबा-आल्कलीचे स्वरूप देणे, आल्कलीचे गुणधर्म उत्पन करणे, कल्याबरूप करणे, कल्यान करणे, क्षारण करणे, क्षारीभूत करणे.. Alkalising pr. p. Alkar lised pa. p. Alkalised p. (v/v.) कल्याधा-क्षारांचे स्वरूप दिलेला, &c. [व्युत्पत्तीने ह्याचा अर्थ ASRES OF KALL कलिभस्म (पोट्याशभस्म), असा होतो. कित्येक लोक आल्कली याला 'कल्याव' हा मराठी शब्द सुचवितात, परंतु याचा अर्थ