पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडणे g.of. s. D. V. t. खचवणे, म्लान करणे. २ (ची) मान खाली पाडणे. Droop'ing n. गळणे n, खचणे n. Droop'ingly adv. Drooped pa. p. Drop (drop) [A. S. dropa, a drop; dreopan, to drop. Dut. drop, Ger. tropfen. ] n. a small portion or particle of liquid थेंब m, टिपका m, टपका (obs. ) m, बिंदु m, बुंद m, थेंबका m, थेंबटा ( R.) m. [ BY DROPS बिंदुशः, थेंबथेंब.] २ a very small quantity of liquid. शिंतोडा m, शीट n, शिटा m. ३ ( of an ornament) a pendant लोलक m, spec. भोंकर n. ४ a trap in the gallows the full of which allows the criminal to drop पडती फळी f, पाडतां येईल अशा कलेली फळी f, फांसावर चढवितांना गुन्हेगारांना उभे करण्याची फळी f. ५ a device for lowering Goods into a ship's hold जहाजांत ओझी उतरून घेण्याचे यंत्र n. ६ a trap-door चोरदरवाजा m. ७ a curtain which falls or drops in front of the stage of a theatre दर्शनी पडदा m, पहिला पडदा m, मुखपट m. ८ a drop-hammer एक जातीचा हातवडा m. ९ pl. थेंबाने घेण्याचे औषध n. किंवा सुगंधी द्रव्य n. १० naut. the depth of a square sail वरपासून खालपर्यंत शिडाची उंची f. D. v. i. टपकणे, टिपकणे, 'टपटप-थबथब-थेंबथेंब पडणे. २ to fall suddenly (एकदम) पडणे, गळणे, गलन n- स्खलन n. होणे g. of s. ३ to come to nothing रहाणे, पडणे, तहकूब होणे. ४ (with m) to come unexpectedly अवचित-अकस्मात् येणे. [IO DROP IN REGULARLY AND CONSTANTLY ठेवलेला-नेमका-टाकला येणे, दत्त म्हणून येणे.] ५ मरून पडणे. ६ to lower खाली होणे, गळणे. D. V. t. थेंब m. pl.-टिपके m. pl. पाडणें-गाळणें-टाकणे, टपटप-थबथब-थेंबथेंब-पाडणें सोडणे गाळणे. २ to let fall सांडणे, पाडणे, पडू देणे, साेडणे, टाकणे. ३ to dismiss, to set aside, to have done with साेडणे, सोडून देणे, गाळणे, टाकणे, नांव n-वार्ता f, वास्तपूस्त f- वासपूस f- वाजपूस f सोडणे g. of o. ४ to bestow or communicate by suggestion (सूचना इ०) हळूच सावधगिरीने देणें ; as, "To D. a hint." ५ ( as in) खाली पाडणे-सोडणे. ६ (पत्र) टाकणें-पाठवणे; as, "To D. a line." ७ to give birth to प्रसवणे, जन्म देणे, विणे, घालणे ; as, “To D. a lamb." ८ to cover with drops (ठिपक्या ठिपक्यांनी) भूषित करणे; as, "To D. with gold.” ९ to omit, to leave out सोडणे, गाळणे. Drop'per n. गाळणारा, सोडणारा, सांडणारा, &c. Drop'ping n. गाळणे n, सोडणें n, पडणे, &c. Drop'pingly adv. थेंबथेंब. Dropsy (drop'-si) [ formerly the form dropsie or ydropsie, the from dropsie being due to loss of y. M. Fr. hydropisie, hydropisia-from Gr. hudor-the water-the word having been formerly written hydropsy. ) n. an unnatural collection of water in any part of the body हातपाय सुजणे n, सर्वांग सुजणे n, रोगामध्ये रुधिराभिसरणाला अडथळा