पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(comp. जलस्रावी-स्रावक). Dripping-wet a. ओला चिंब, थबथबीत, चबचबीत, चिबचिबीत, चीब. [To BE DRIPPING-WET चबचबणे, चिबचिबणे. ] Drip-stone n. पाणी बाजूने टिपकवून लावण्यासाठी दरवाज्यावर केलेले झुकाऊ कारनिस n, पाणझुकाव m, पाणकारनिस n. Drip'pingly adv. थबथब, थबाथब, टपटप, टपाटप, चिबचिब. Right of drip (law) (एकाच्या छपरावरून) दुसऱ्याच्या जागेत पाणी पडू देण्याचा हकक m. Drive (driv) [A. S. drifan, to. drive; Ger. treiben, to push.] v. t. to push forward, to compel. to move on पुढे लोटणे-ढकलणे. [In this first sense in some particular contexts the words used are:-दवडणे, दपटणे, दामटणे, लाटणे, रगडणे, रपाटणे, लाटालाटीने दपटणे.] २ (as a nail) मारणे, ठोकून रोवणे, टापरणे, ठोकणे. ३ (as cattle, birds, &c.) हाकणे, हाकलणे, हाकून-हाकलून देणे, पिटून लावणे, धुडकावणें, दवडणे, घालवून देणे, घालवणे, पिटाळणे-पिटाळणी करणे. [PARTICULAR WORDS OR INTERJECTIONS ARE USED IN driving away or off. THOSE USED TO A BEAST, GENER ARE इत्त, हुडुत्त.-TO A CAT, छुक् छुत्, OR शुक्क & शुत्, शिर (obs.)-TO BIRDS, हो, हा, हुश्श OR हुस्स.-TO CROWS, &c. ह्ड्या.-TO A DOG, ह्ड, ह्डह्ड, हडि.] ४ (a flock, a beast, &c.) हाकणें or हांकणे, हाकून नेणे, हाकवणे, हाकलणे. [PARTICULAR WORDS OR INTERJECTIONS ARE USED IN driving on: THOSE USED TO A HORSE OR BULLOCK ARE, झ्यां, झ्याइयां-- TO AN ELEPHANT, धकधक, धगधग, धगेधगे OR दगेदगे, धा. -TO CATTLE, थैक, हैक, इड.-TO FOWLS, खुड.-TO SHEEP OR GOATS, तिर OR थिर--TO PIGS, डू.] ५ to convey in a vehicle drawn by a beast गाडीतून नेणे; as, "To D. a person to his own door." ६ (a vehicle) हांकणे-हाकणे, चालवणे. ७ to urge or impel vehemently पिटाळणे, पिटणे, हाकलणे, पिटाळणी करणे, दवडणे, दडपणें, दामटणे, ढकलणे. ८ (a trade or bargain) सुरू-चालू ठेवणे. ९ to clear by forcing away what is contained (अंतर्गत वस्तु) हाकवून काढणे. १० to dig horizontally (क्षितिजाशी) समान्तर रेत खणणे. D.v.i. to move furiously जोराने जाणे-येणे. २ गाडीत बसून जाणे. ३ to tend to कल m- ओढा m- ओढ f धोरण n. असणे with g. of o. ४ to be driven towards (कडे) ओढला-जाणे, (कडे) वाहत जाणे. Driv'ing pr.p. Drove pa. t. Driv'en pa. p. Drive n. गाडीत बसून फिरणे n- जाणे n. २ गाडीत बसून जाण्याचा रस्ता m, गाडीमार्ग m. ३ कामाची तडफ f- उतावळ f- त्वरा f. ४ एकत्र हाकलेले किंवा वाहून गेलेले पदार्थ m. pl. Driv'er n हाकणारा m, गाडीवान m; धुरेकरी m (for more meanings see the verb.) Driving-band n. चालविणारा पट्टा m, एका यंत्राच्या गतीने दुसऱ्या यंत्राला गति देणारा पट्टा m. Driving-shaft n. यंत्रांना गति देणारी लाट f, चालविणारी लाट f. Driving-wheel