पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

3 to instruct thoroughly in any art or branch of knowledge (कोणत्याही कलेची किंवा विद्येची) पुरी तालीम f. कवाईत f- शिक्षण n. देणे. D. v. i. तालीम-कवाईत-करणे. D. n. an auger सामता m, विंधणे n, वेधन n. २ military exercise कवाईत f, तालीम f. ३ (कोणत्याही विषयाची) कडक तालीम f, सक्तशिक्षण n; as, "A D. in Latin grammar." Drill-master n. कवाईत शिकवणारा. Drill-sergeant n. (लष्करी शिपायांना) कवाईत शिकवणारा 'सार्जन्ट' m. Drill ( dril ) [Of English origin.] v. t. (R.) झरझरून वाहत लावणे. २ to sow, as seeds, by dribbling them along a furrow or in a row पांभरीतून पेरणें. ३ (obs.) (-ला) लालूच दाखवणे. D.v.i. पांभरीने पेरणे. D. n. कुळव m, गुठळ्या मोडण्याचा नांगर m. Drill-plough n. पांभर f. [ D. OF TWO TUBES मोबड m. f. n., मोघण n. f. D. OF THREE TUBES टिफण f, OR टिफणी f, OR टिफणे f. TUBE OR CHANNEL OF A D. फण m. SEED-BOX OF A D. चाडें or चाडें n.] Drill-harrow n. दांताळे n. Drink ( drink) [A. S. drincan, to drink.] v. i. पिणे. २ दारू पिणे, दारू पिण्याची संवय असणे, दारूबाज-निशाबाज असणे, ठांसून पिणे. D. V. t. पिणे, प्राशन-पान करणे. २ to sucks up, to absorb, to inbibe (आंत) सोखून-शोपून घेणे. ३ (ज्ञानेंद्रियद्वारा) आंत घेणे. To drink down दाबून टाकणे, गिळून या पोटांत.घालणे; as, "To D. down unkindness." To drink in पिणे, आंत घेणे. To D. off or up एका खेपेने पिऊन टाकणे. To D. the health of, To D. to the health of एखाद्याचे कल्याण किंवा आरोग्य चिंतीत (त्याच्या नांवानें) दारू पिणें, 'आरोग्यपान करणे. D. N. पिण्याचा पदार्थ m, पेय n, पानद्रव्य n. [ COOLING DRINK शीतपेय n.] २ मदिरापान n, माद आणणारे पेय n; as, "When D. is in, wit is out." Drink-money n. दारू पिण्याकरितां दिलेलें पोस्त n. [ IN DRINK छाकटा, प्यालेला. STRONG DRINK जहाल-तीव्र-कटक दारू.f.] Drink'able a. पिण्या-प्याया-चा-जोगता- &c. पेय, पानयोग्य. D. n. (esp in pl.) पिण्याचा पदार्थ m. Drink'er n. पिणारा, प्राशनकर्ता, पानी (as, मद्यपानी), पी ( in comp. as, मद्यपी), प (in comp., as, मधुप). Drink'ing n. पिणे n, प्राशन n, पान n. (esp. in comp., as, अमृतपान, मधुपान.) २ practice of drinking to excess अतिशय दारू पिण्याची खोड f. Drip ( drip ) [ Of Scandinavian origin. ] v. i. to fall in drops टपकणे, टिपकणे, गळणे, पाघळणे, स्रवणे, पाझरणे. २ to let full drops of moisture or liquid टपकणे, ठिपकणे. D. v.t. to let fall in drops टिपकत टिपकत खाली सोडणे. D. n. टिपकणें n, ठपकणे n, टपकणी f, टिपक f, टिपकणी f, गळ f, गळती f, स्त्राव m, स्रवण n, पाघळ m. २ that which falls in drops गळ f, गळती f. ३ the edge of a roof छपराची कोर f. Drip'ping n. गळणे f, गळती f. D. a. टपकणारा, स्रावी