पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

adjust to a straight line & at proper distance एका रांगेनें सारख्या अंतरावर उभे करणे, व्यवस्थित लावणे as, "To D. the ranks." २ (med.) to treat methodically with remedies bandages, &c. as a sore or wound जखम बांधणे,(जखमधुऊन साफ करून) मलमपट्टी बांधणे. ३ To D. या शब्दाचे संदर्भानें 'उपयोगी पडेल असे करणे', 'तयार करणे', 'सजविणे', 'स्वच्छ करणे इ. अनेक अर्थ होतात; जसे, [(a) To D. FOOD अन्न शिजवून तयार करणे. To D. LEATHER चामडे उपयोगाकरितां तयार करणें-कमावणे. To D. A LAMP दिवा पुसून वात कापून स्वच्छ करणे. To D. A GARDEN बाग तयार करणे. To D. A HORSE घोड्याची चाकरी-मालीस करणे. To D. GRAIN धान्यदाणा पाखडणें-निवडून साफ करणे. To D. ORES (mining) (अशुद्ध धातू) वर्गावर्गी करून शुद्ध करणे. To D. UP or OUT भपकेदार पोषाख करणे, चट्टीपट्टी करणे. To D. A SHIP (स्वराष्ट्रचिह्नांकित वावटे वगैरे उभारून) जहाज शृंगारणे.] ४ to cut to proper dimensions, to give proper shape to (कापून-ठोकून) बेतशीर आकार m-रूप n. देणे. ५ to put in proper condition by appareling (as the body ), to clothe, to apparel, to deck वस्त्र-वस्त्रे नेसवणें-पेहेरणें, जामानिमा करणे, पोषाख घालणें-चढविणे करणे, वेषान्वित-वस्त्रभूषित करणे. ६ to break & train. for use (as a horse &c.) शिकविणे, उजू करणे, शिकवून तरबेज करणे. D.v.i. mili to arrange one's self in due position in a line of soldiers (शिपायाने आपली रांग धरून) नीट ठिकाणावर उभे राहणे. (रांगेने उभे करण्याचे वेळी हा खुणेचा शब्द उच्चारितात.) [ To D. TO THE RIGHT, To D. TO THE LEFT, TO D. ON THE CENTRE (mili.) (च्या) उजवीकडे-डावीकडे-मध्ये रांग धरून उभे राहणे.] २ to clothe or apparel one's self, to put on one's garments पोषाख-कपडे करणे-घालणें-चढविणे-पेहेरणे, वस्त्र परिधान करणे. D. n. clothes, garments, habit, apparel पोषाख m, कपडे m. pl., वस्त्रे n.pl., पेहेराव m, वेष m. २ a lady's gown सभ्य-गरती स्त्रीचा झगा m. ३ attention to apparel or skill in adjusting it पोषाखाच्या टापटिपीटकडे विशेष लक्ष n, प्रसाधनविधिनैपुण्य n, पोषाखाचा शोक m. D.- circle n. नाटकगृहांतील-थेटरांतील ज्यास्त भाड्याची-दराची प्रमुख गल्लेरी f- ग्यालरी f- माडी f. Dress-parade (mili.) (सैन्याच्या पाहणीच्या वेळी) सारखा पोषाख घालून केलेली कवाईत f. Dress-coat n. (फक्त पाठीमागेंच) घोळ-झोल-झोळ असलेला आंगरखा m- कोट m. Dress'ed p. a. वस्त्रभूषित,आच्छादित, वस्त्रयुक्त, सवस्त्र. २ शिजविलेला &c. Dres'ser n. one who makes ready for use by putting in order दुरुस्ती करणारा m, नीट करणारा m. २ one who puts on clothes पोषाख घालणारा, कपडे चढविणारा, वेष देणारा. ३ an assistant in a hospital, whose office it is to dress wounds &c. जखमा बांधणारा मदतनीस m, मलमपट्या तयार करून बांधणारा, उपवैद्य. ४ (mining) a kind of pick for shaping large coal मोठा कोळसा तासण्याचे पिकांव n. ५