पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

N. B.-Drawing या शब्दाचा उपयोग सामासिक शब्दांत पूर्वपदाचे ठिकाणी विशेषणासारखा करितात व त्या वेळी त्याचा अर्थ चित्रकर्मासंबंधी असा असतो; जसें, D.-master n. चित्रकर्म शिकविणारा. D.-board n. चित्रालेख्य n, चित्रफलक m. D. pen n. (चित्र काढण्याचे ) कलम . इ०. N. B.-Draw & drag distinguished : Draw तजविजीने जोर लावून पुढे ओढणे. Drag फरारा ओढणे. ज्या वेळेस ओढण्याकरितां कांहीं साधन-सामुग्री घेतलेली असते त्या वेळेस तशा ओढण्यास Draw असे म्हणतात; व साधनावांचून मोठ्या कष्टाने फरपटीत नेणे याला Drag असे म्हणतात. Drawl ( drawl) [Frequentative of draw; parallel to draggle from drag. Introduced from Dut. dralen, to be slow, to linger; from dragen, to draw.] v. t. to utter in a slow, lengthened tone हेल काढून उच्चार करणे-बोलणे. D. v. t. (obs.) (आळसाने-मल्लपणाने-अकडीने) ओढत बोलणे, ओढून बोलणे, हेल काढून बोलणे. D. n. a lengthened, slow, monotonous utterance एकसुरी पाल्हाळिक भाषण n. Drawl'er n. ओढून बोलणारा. Drawl'ing n. Drawl'ingly adv. Drawloom (draw'-loom) n. a kind of loom used in wearing figured patterns नकशीचा पिंजरा m, कापडांत कांहीं नकशी अगर वेलबुट्टी काढावयाची असली म्हणजे मागाचे डोक्यावर एक प्रकारची पिंजऱ्यासारखी यंत्ररचना असते ती f. २ ज्या मागास असा पिंजरा असतो तो माग m, नकशीच्या पिंजऱ्याचा माग m, डॉबीचा माग m, अगर सांचा m. ३ अशा मागावर तयार केलेलें एक प्रकारचे दमास्क नांवाचे कापड n. Drawn (drawn) pa. p. of Draw ओढलेला, ताणलेला, आकर्षित, आकृष्ट. २ म्यानांतून बाहेर काढलेलें (शस्त्र n.). ३ (ओढून) वाढविलेला. ४ चित्रांत काढलेला. [D. BUTTER. n. वितुळविलेले लोणी n. D. FOWL n. आंतडी बाहेर काढलेले कोंबडी इ. पक्षी m. pl. D. GAME Or BATTLE n. बरोबरीचा-निकाल न लागलेले-ज्यांत कोणाचाच जय नाही असा खेळ m-युद्ध n, समयुद्ध n. D. fox n. आश्रयस्थानापासून हुसकविलेले खोकड n. D. WORK n. कापडांतून पाहिजेत तसे निरनिराळे धागे ओढून काढून एकादा नकशीचा तयार केलेला नमुना m. AT DAGGERS D. lit. हत्यार उपसून तयार, नेहमी कलह करणारे.] Dray (dra ) n. a squirrel's nest खारीचे-खारकुंडीचे घरटें n-घर n. Dray ( drā ) [A. S. droege, that which is drawn. See Draw.] n. a strong low cart used for heavy Burdens ओझ्याची गाडी f, खटारा m, गाडा m, छकडा m. २ a kind of sledge or sled चाकाशिवाय-बिनचाकी गाडी f, बर्फावरून सरपटत जाणारी गाडी f, Dray'age (dra-aj) n. use of a dray खटार गाडीचा-खटाऱ्याचा उपयोग m. २ the charge of a dray खटाऱ्याचे भाडे n. Dray'man n. खटारेवाला m. Dread (dred) [A. S. drædan, in comp.; akin to Q. S, dradan, O. H, G. tratan, to dread, to fear.]