पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देणारा m, ज्याच्यावर हुंडी लागू करावयाची तो मनुष्य m, हुंडीचा स्वीकार करणारा m. Draw'er n. one who, or that which, draws आकर्षक, कर्पक, काढणारा, ओढणारा; as, (a) who draws liquors for guests दारूच्या पिठ्यांतील चाकर m. (b) who delineates or depicts चित्रकार m, चितारी m. (e) who draws a bill of exchange or order for payment हुंडी लागू करून पैसे घेणारा m. २ that which is drawn ओढून काढलेली वस्तु f; as, (a) a sliding box or receptacle in a case खण m, खाना m, घर n, कप्पा m, पूड n, ओढखण m. [ SECRET D. चोरखण m, चोरघर n, चोरकप्पा m. ] (b) pl. इजार f, पायजमा m, चोळणा m. Draw'filing n. (गुळगुळीत करण्याकरितां) कानशीने आडवें घांसणे n, कानसणे n. Draw'gear n. harness for draught horses ओढ्याच्या घोड्याचा खोगीर m- जीन m. n. २ ( Railroad) means or parts by which car's are connected to be drawn डबे जोडण्याचे साधन n-कडी f. Draw'ing n. the act of pulling or attracting ओढणे n, आकर्षणे n, आकर्षण n, कर्षण n. २ (a) the act or the art of representing any object by means of lines & shades चितारकाम n, चित्रं काढणे n, नकाशा काढणे n, चित्रकला f. (b) the figure or representation drawn चित्र n, आलेख्य n, तसबीर f, नकाशा m. ३ the process of stretching or spreading metals as by hammering हातोड्याने ठोकन धातूचे पत्रे करणे n-तार ओढणे n, पत्रा ठोकणे n. ४ (textile manuf. ) the process of pulling out & clongation the sliver from the carding machine, by revolving rollers, to prepare it for spinning सूत काढण्याकरितां तयार करणे. ५ the distribution of prizes & blanks in a lottery सोडतीतील बक्षिसे वांटणे n. D.-instruments m. चित्रसाहित्य n, नकाशा काढण्याची हत्यारे n. pl. D.-paper n. चित्रपत्र n, चित्र काढण्याचा कागद m. D.-pen n. चित्रलेखनिका f. D.-pencil n. चित्रशलाका f, चित्र काढण्याची कठिण पेन्सिल f. D.-ping n. pl. जाड बोंडाच्या टांचण्या f. D.-room n. a room appropriated for the reception of company, a room to which company withdraws from the dining room पाहुण्यांचे स्वागत करण्याची जागा f, बैठकीची जागा f, कचेरी , दिवाणखाना m. २ the company assembled in such a room दिवाणखान्यांत जमलेली मंडळी f. ३ a reception of company in it मंडळीचे दिवाणखान्यांत स्वागत n. D.-table n. चित्रे काढण्याचे टेबल n- मेज n. फलक m. Draw-knife n. पोकशी f. (corrupted from spokeshave.) Draw-plato n. भोके पाडलेली सोनाराची पोलादी पट्टी f, वेज(झ) -पट्टी f. हिचा उपयोग तार ओढून बारीक व लांब करण्याकडे होतो. Drawing the king's or queen's picture खोटे नाणे पाडणे n. Drawing the nail शपथ f, प्रतिज्ञा f माघारी घेणे.