पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिका f. Drain'er n. गाळणारा मनुष्य m. २ (प्रवाही पदार्थ गाळण्याची) चाळण f. ३ (दोडक्यांतील-&c.) शिवें n. ४ (दलदलीच्या जागेत पाणी बाहेर काढन देण्याकरिता) पाट किंवा चर किंवा मोरी बांधणारा m. Draining rack n. photo. निथळणे n. Drain-pipe n. फाजील पाणी वाहून नेणारी नळी f. Drain-tile n. गटार-मोरी बांधण्याची पोकळ कौलें n. pl. also called draining-tile. Draining-trap n. मोरीवरील झांकण, डबास. Drake (drak ) [ M. E. drake, not found in A. S. cf. drake, a drake, L. Ger. M. Swed. drake, (1) a dragon (2) a drake, (3) a boy's kite.] n. the male of the ducks kind. बदकाचा नर m, हंस (?) m, कलहंस (?) m. २ the drake fly मासे मारण्याच्या गळाला लावण्याची एके जातीची माशी f. [D. STONE-n. पाण्यावर भिंगरी उडविण्याचा चपटा दगड m. भिंगरीचा खेळ Mm. दगड बुडण्यापूर्वी तो पाण्यावर एका जागेवरून दुसरीकडे असा बरेच वेळां उडत जातो याला भाकरी अगर भिंगरी असे म्हणतात. SOMETIMES CALLED DUCKS & DRAKES.] Dram (dram) [M. Fr. drame, drachme a dram,' eighth part of an ounce -L. drachma -Gr. dracum, a handful -Gr. drachein, to grasp.] n. ड्राम वजन n. [औषधं तोलण्यांत याचे प्रमाण एक अंसाचा ८ वा भाग किंवा ६० ग्रेन असे आहे. साधारण व्यवहाराचे वजनांत एक अंसाचा १६ वा भाग m.] २. a minute quantity, a mite अगदी थोडे प्रमाण n, अल्प मान n. (fig.) अंश m, गंध m, लेश m. ३ as much spirituous liquor as is taken at once दारूचा घोंट m, घोटभर दारू f. ४ a portion घोंट m, घटका m. ५ (Numis a Persian daric हराणांतील डेरिक नांवाचे नाणे n. D. v. i. & v. t. (Low) to ply with drams (-ला) f पाजणे-दारूचा घुटका m देणे, दारू पिणे, घुटका घेणे, आग्रहाने-गळ घालून दारू पाजणें. Dram-drinker n. दारूबाज. Dram-shop n. दारूचे दुकान n, पिठ्ठा m, गुत्ता m, रोंद m, शौडिकापण f (S.) Drama (dram'a) [L. drama Gr. an act, & drama Gr. - drasin, to do.] n. a composition in prose or poetry accommodated to action नाटक n, रूपक n. [STYLE OF DRAMATIC REPRESENTATION OR COMPOSITION वृत्ति f- AMONG THE HINDUS, THESE ARE FOUR VIZ. कोशिकी, भारती, सात्वती, आरभटी. CERTAIN SPECIES OR VARIETIES OF THE Drama ARE: - ललित, भाण, संगीत, समवकार, प्रहसन, डिम, व्यायोग, &c. COURSE OR ARRANGEMENT OF A D. नाटकप्रपंच m. DRAMATIC RECITATION n. भारती f. DRAMATIC PERSON n.pl. पाने n. pl. PHRASEOLOGY OF THE D. नाट्योक्ति f. RELIGIOUS D. ललित M. SCIENCE (RULES & LAWS) OF THE D. नाट्यशास्त्र n, भरतशास्त्र n.] २ a series of real events invested with a dramatic unity & interest नाटकाप्रमाणे एकरूपता व कुतूहल उत्पन्न करणारी प्रत्यक्ष घडून येणाऱ्या गोष्टींची मालिका f, नाटक n.