पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हालहाल करविणे-करणे-लुटविणे ताब्यात घेणे. २ to compel. submission by violent measures, to persecute, to harass (असुरी-कडक उपायांनी) अम्मल बसविणे, जुलूम-सक्ति-उल करणे, हैराण करणे. Dragoon-bird n. दक्षिण अमेरिकेतील तुरा असलेला पक्षी m. (called also the umbrella bird. ) Drain (drān) [ A. S. drehnigean, to drain, strain. ] v. t. to draw off by degrees, to cause to flow gradually out हळूहळू काढून घेणे, पागळवणे, निथळणे, निथळून-निचरून काढणे. २ to cause the exhaustion of रिकामा-खाली करणे, खलास करणे, सोपविणे, खपविणे, खपवून टाकणे, (fig.) धुऊन नेणे. ३ to remove surface water (as from streets, by gutters, &c.) to deprive of moisture (चा) ओलावा काढून टाकणे, कोरडा करणे, (-वरचे) पाणी काढून टाकणे. ४ to exhaust, to empty of wealth, resources, &c. निर्धन करणे, (वैभव-संपति) हिरावून नेणे, धुवून नेणे (fig.). ५ to filter (चाळणीतून) गाळणे, झिरपवणे. D. v. i. to flow off gradually हळूहळू वाहून जाणे. २ a become emptied of liquor by flowing or dropping दारू निथळणे, पागळणे, निचरणे. D. n. gradual & continuous outflow or withdrawal पाझर m, गळती f, गळ f, धुपणी (fig.), उपसा m, बाहेर नेणे n, अपनयन n; as, "The D. of specie from a country." २ that by means of which anything is drained, channel, watercourse, sewer नाला m, मोरी f, पाट m, गटार n, जलनिर्गमनमार्ग m, सारणी f, प्रणाली f. ३ pl. the grain from the mashing tub (दारू गाळून घेतल्यानंतर) पिपांत राहणारा धान्याचा भाग m, गाळमळ m, गाळसाळ m, रेंदा m, पेंड f. (on the analogy of तिळांची पेंड f.) [ RIGHT OF D. n. law. दुसऱ्याच्या जागेतून नळ घालून पाणी काढून लावण्याचा हक्क m.] Drain'able a. पाणी काढून लावता येण्याजोगा, &c. Drain'age n, a gradual flowing off of any liquid प्रवाही पदार्थ हळूहळू वाहून जाणे n, द्रवनिःसरण n. २ that which flows out of a. drain मोरीतून वाहून जाणारा पदार्थ m. ३ the mode in which the water's of a country pass off by its streams & rivers. (नद्या, नाले यांच्या योगाने देशांतील) पाणी वाहून जाण्याची पद्धत f. ४ (Eng.) the system of drains and their operation by which superfluous water is removed from towns अधिगुणे (-अधिक+उणे)-अधिक झालेलें-फाजील पाणी वाहून जाण्याची-नेण्याची व्यवस्था f, रस्ते m, मोऱ्या f, गटारें n, &c. ५ area or district drained पाणी झिरपवून टाकलेला प्रांत m- प्रदेश m. ६ surg, the act, process, or means of drawing off the pus or fluid from a wound &c. (जखम, फोड वगैरेमधून) पू-पाणी झिरपवून टाकण्याची क्रिया f, रीति f- साधन n, जखम वाहविणे n. Drainage-tube n. surg. (पू-पाणी वगैरे काढण्याकरिता) जखमेत घाल