पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"To drag stone or timber; To drag a net in fishing." २ to break, as land, by drawing a drag or harrow over it; to harrow (कुळव फिरवून शेतांतील) डिखळे फोडणे, कुळवणे. ३ to draw a drag along the bottom of (as) a stream or of other water; hence to search as by means of a drag (खुडालेल्या पदार्थाच्या शोधार्थ नदी-नाला वगैरेंत) जाळें-गळ वगैरेंनी किंवा इतर साधनांनी शोधणे. २ (fig.) (तून) यत्नाने शोधून काढणे; as, " Then while I dragged my brains for such a song." ४ to draw along as something burdensome; hence to pass in pain or with difficulty (जड झालेला नकोसा झालेला पदार्थ) ओढणे, (कंटाळत-दुःखाने-संकटाने कसेतरी) कंठणे, चालवणे, रडतखडत चालविणे-घालविणे, ढकलणें ; as, "I have dragged a lingering life." D. v. i. to be drawn along as a rope or dress, on the ground; to trait, to be moved inward along the ground or along the bottom of the sea as an anchor that does not hold फरफटणे, फरफटत जाणे, (वस्त्र, दोरी इत्यादि) लोळत जाणे, (जहाज जसे हलक्या नांगराला खरडीत नेते तसे) खरडले जाणे. २ to move onward heavily, laboriously, slowly, to go on lingeringly कष्टानें-रेंगाळत जाणे, ढकलत ढकलत जाणे, रखडणे, री री करणे, हळूहळू चालणे, कष्टाने वाट कंठणे. ३ to fish with a dragnet ओंढ-जाळे टाकून मासे पकडणे. ४ to serve as a clog or hindrance, to hold back गतिरोधक होणे, अडचण-विघ्न होणे, अडवणे, पुढे जाऊ न देणे, मागे ओढून धरणे. Drag'ging pr.p. Dragged pa. p. Drag n. net or an apparatus to be drawn along the bottom under water as and fishing, searching for drowned persons &c. मास धरण्याचे जाळें n, (बुडालेल्या वस्तु अगर मनुष्ये शोधण्याचा) गळ m. २ a kind of sledge for conveying heavy bodies; also a kind of low car or handcart (जड सामान नेण्याची) बैठी गाडी f, खटारा m, as,"Stone drag" वडाऱ्याची गाडी f, दगड वाहण्याची गाडी f. ३ a heavy harrow for breaking up ground (मातीची ढिकळे or ढेपळे फोडण्याचा) कुळव m. ४ a heavy coach with seats on top; also a heavy carriage बसण्याच्या जागा जीत वर केलेल्या असतात अशी एक प्रकारची जड गाडी f, जड गाडी f, एक प्रकारची गाडी f. ५ anything towed in the water to retard a ship's progress or to keep her head up to the wind; esp. a canvas bag with a hooped mouth so used (जहाजाचा वेग कमी करण्याकरितां अगर जहाजाचे टोक सरळ वर राहण्याकरिता) जहाजाला बांधून पाण्यांत सोडलेला पदार्थ m, वाटोळ्या तोंडाची किंतानाची पिशवी f. (बहुतकरून हिचाच या कामी उपयोग करतात.) ६ a skid or shoe for retarding the motion of a carriage wheel (उतरणीच्या वेळी चाकांची गति बंद करण्याकरितां चाकांत अडकविण्याची) ओढखीळ f, अडणी f, घोडा m, लक्कड f, अटकाव m. ७ any thing