पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक अथेनिअन कायदे करणारा होता. त्याने केलेल्या कायद्यांत कायदा मोडणाऱ्या प्रत्येक अपराध्याला देहान्त शिक्षा सांगितली होती व ह्यावरून ड्रेकोचे कायदे माणसांच्या रक्ताने लिहिलेले आहेत असे डेमोडिस नांवाच्या वक्त्याने एकदां भरसभेत म्हणून दाखविले होते.] a. ड्रेकोसंबंधी, ड्रेकोप्रणीत. २ जुलमी, जुलमाचा. Draconian Code or Draconian laws: a code of laws made by Draco ड्रेकोने केलेले-ड्रेकोप्रणीत कायदे m. pl. 2 (the measures of Draconian laws were so severe that they were said to be written in letters of blood; hence) any laws of excessive rigour' (ड्रेकोचे कायदे इतके कडक असत की, ते रक्ताने लिहिलेले आहेत असे लोक म्हणत; आणि म्हणून कोणत्याही जुलमी कायद्याला हा शब्द लावतात.) जुलमी-जुलमाचे कायदे m. pl. Dracontic (drā-kon'-tik ) [From L. draco, dragon, in allusion to the terms dragon's head and dragon's tail.] a. astron. belonging to that space of time in which the moon performs one revolution from ascending node to ascending node राहूपासून राहूपर्यंत फेरी करावयास चंद्रास जो काळ लागतो त्यासंबंधी चंद्र दक्षिणेकडून उत्तरेकडे जातांना चंद्रकक्षा क्रान्तिवृत्तास जेथें छेदते त्या बिंदूस राहू असे म्हणतात. Dracontic month साम्यातिक चान्द्रमास m. Dracunculus (drā-kun'-kū-lus) [L. diminutive of draco, dragon.] zool. नारू m, दोरा m. २ एके जातिच मासा m. Dracunculi pl. Draff (draf ) [ Dut. draf, the sediment of ale.] n. refuse, lees, dregs, waste matter कचरा m, गाळ m, गाळा m, गदळ m, गबाळ m. २ the wash given to swine or cows आंबोण f. ३ hog awash माल्ट दारू गाळून घेतल्यानंतर राहणारा धान्याचा भाग m. हा डुकरांना खाण्यास घालितात. Draff'ish, Draff'y a. गाळाचा. २ असार, मलिन. Draft (dräft) [The same word as draught, O. E. draught, draht from A. S. dragan, to draw.] n. the act of drawing ओढणे n, ओढ f, ओढण f. २ the thing drawn ओढलेली वस्तु f. ३ mili, a selecting or detaching of soldiers from an army or from any part of it or from a military post लष्करांतून किंवा कोणत्याही टोळीतून-ठाण्यांतून शिपाई काढून निवडून घेणे, निवडणे n. तसेंच कोणत्याही देशांतून-समाजांतून किंवा सामान्य जनसमूहांतून काही शिपाई निवडून घेणे n, निवडक शिपाई m. ४ an order from one person or party to another directing the payment of money हुंडी f, चिठ्ठी f. [DRAFT ON DEMAND, -PRESENTATION OR AT SIGHT दर्शनी हुंडी f.] ५ allowance or deduction made from the gross weight of goods (घाऊक मालावर दिलेला) कढता m, कांटा m. ६ a drawing of lines for a plan, a plan delineated