पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Down'castness n. खिन्नता f. Downcome n. sudden fall, overthrow आकस्मिक नाश m, उच्छेद m, विध्वंस m, ऱ्हास m. २ (Iron Manuf.) ज्वालाग्राही-वायुवाहक नलिका f- नळी f. Down-draught n. चिमणींतील वाऱ्याचा झपाटा m. Downfall n. a sudden fall पतन n, अधःपतन n, पात m, खाली पडणें n. २ a body of things falling पतन पावणारा वस्तुसमूह m. 3 a sudden descent from rank or state, reputation or happiness; ruin अपकर्प m, ऱ्हास m, पद-स्थानच्युति f- भ्रंश m, अधःपात m, विनिपात m, नाश m, अधिकारभ्रष्टता f. च्युति f. Downfallen a. नाश झालेला-पावलेला, भिकेस लागलेला. Down-gyved a. (poetic & rare) (Shakes.) बिडी-शृंखलेप्रमाणे खाली लोंबणारा. Down-haul n. naut. a rope to haul down a sail शीड खाली पाडण्याचा-ओढण्याचा सोल m- दोरखड n. Down-hearted a. निराश, उदास, विषण्ण, गतोत्साह. Down-hill adv. टेकडीच्या पायथ्याशी-पायथ्याकडे. Down-hill a. declivous, sloping उतरट, उतरता, उतरत गेलेला. Down-hill n. declivity, descent, slope उतरण f, उतार m. Down-line n. मुख्य ठिकाणापासून इतर ठिकाणी जाणारा आगगाडीचा रस्ता m. Down-looked a. (R.) dejected, gloomy, sullen खिन्न, अधो-मुख-वदन, उदास. Down-lying n. time of repose विश्रांति घेण्याची वेळ f- काळ m. [AT THE D. (Scot.) प्रसूतिकाळच्या वेदना होत असतांना.] Down-pour n. भयंकर-जोराचा वर्षाव m, पावसाची मुसळधार f, एकसारखा पाऊस कोसळणे n. Down-right adv. perpendicularly सरळ-उभ्या-लंब रेषत, ओळंब्यांत. २ in plain terms, without ceremony सरळ, स्पष्ट, साफ, धडधडीत, नीट, चोख, उघड, चरचरीत, पडदा ठेवल्याशिवाय, सणसणीत. ३ (obs.) without delay, at once एकदम, ताबडतोब, लगेच, वेळ न लागतां. ४ completely पूर्णपणे, पूर्ण. Down-right a. plain, direct, blunt, unceremonious उघड, मोकळा, सरळ, नीट, धोपट, वक्रभाव-रहित-शून्य. २ undisguised, open, absolute उघड दिसणारा, स्पष्ट. Down-rightness n. स्पष्टपणा m, उघडपणा m, निर्भीडपणा m. Downrightly adv. चोखपणाने, सणसणीत. Down-rush n. अधःसरण n. Down-share n. (Eng.) (माळजमिनीवरचे गवत कापून टाकण्याची) नांगरवजा कातर f. Down-sitting n. खाली बसणे n, आराम m, विश्रांति f. Down-stairs adv. खालच्या मजल्यावर, तळमजल्याला. a. तळमजल्यावरील. Down-stream adv. (पाण्याच्या) प्रवाहाच्या दिशेला-वाहत्या दिशेकडे. Down-stroke n. अधोरेषा f, खाली रेघ मोडणे n. Down-throw n. खाली फेंकणें n. २ geol. एका बाजूस खडकाचे थर खाली खचणे n, खडकांचे अधःपतन n. Down-train n. मुख्य स्टेशनापासून इतर ठिकाणी जाणारी आगगाडी f. Down-trod, Down-trodden a trampled down पायांखाली तुडविलेला-चिरड्लेला. २ abused by superior power (वरिष्ठ अधिकाऱ्यानी) उपमर्द-अप-