पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Dorsal ( dor'-sal) [L. dorsum; It. dorso, the back.] a. pertaining to the back पाठीचा, पृष्ट्य, पृष्ठासंबंधी, (bot.) पृष्ठभागाचा, पृष्ठासंबंधी. D. n. (सिंहासनाच्या किंवा ख्रिस्ती लोकांत यज्ञकुंडाच्या मागे) लोंबत ठेवलेला उंची कपडा m-पडदा m. Dor'sally adv. Dorsibranch'iate a. पाठीवर कल्ले असलेला. D. n. पाठीवर कल्ले असलेले प्राणी m. pl. Dorsif'erous a. ज्या वनस्पतींच्या पानांच्या पाठींतून बी येते अशा (वनस्पति), पृष्टप्रसव, आईच्या पाठीकडून ज्यांची उत्पत्ति होते असे (प्राणि), पृष्ठप्रसव. (पृष्ठात् प्रसवो येषां ते.) biol. पृष्ठवाही, Dorsig'erous a. पाठीवर वाहणारा, पृष्टवाही. Dors'um n. डोंगराचा कडा m. २ जनावराची मागची बाजू f, पृष्ठभाग m, वरचा भाग m. Dorsal region anat. पृष्ठप्रदेश m. Dorsal spine पाठीचा कणा m. Dorsalis psoriasis med. हस्ताच्या पृष्ठावर होणारा एक त्वगरोग m, हस्तपृष्ठावदरण n. Send to dorse पाठीवर फेंकणे. Dory ( daw'-ri) n. लहान होडी f. Dose (dūs ) [ O. Fr. dose, a quantity of medicine given at once-L. dosis-Gr. dosis, a giving. ] n. औषधाचे प्रमाण n. प्रत्येक वेळी औषध किती घेणें तें, एक वेळेपुरताच दिलेला दवा m-औषध n, मात्रा f, औषधपरिमाण m, घुटका m, घोंट m, औषधप्रमाण n, डोस m. २ एखाद्यावर त्याच्या मर्जीविरुद्ध लादिलेला भाग m, अप्रिय भाग m, कंटाळा उत्पन्न होईल अशा रीतीने दिलेला भाग m. D. v. t. भाग करून देणे. २ औषध देणे, प्रमाणाने औषध देणे. ३ (किळस येईल असा) अप्रिय पदार्थ देणे. Dos'age n. भाग करून देणे. Dosim'eter n. an apparatus for measuring doses or the like (औषधाचें) भाग मोजण्याचे यंत्र n. Dosol'ogy, Dosil'ogy n. कोणच्या प्रमाणानें कोणतें औषध देणे याविषयी शास्त्र n. औषधप्रमाणशास्त्र n. Doss (dos' ) n. गवताचा बिछाना m. Doss-house n. अतिस्वस्त भाड्याचे शयनगृह n. Doss'er n. वरच्या प्रकारच्या घरांत राहणारा. Dossal (dos'-sal ) n. ख्रिस्ती देवळांत 'च्यान्सेल' वर टांगलेले चित्रविचित्र रंगाचे सुशोभित कापड n. Dosser (dos'-er ) n. पेटारा m, टोपली f. २ भिंतीचा पडदा m. Dost (dust) 2nd pers. sing. pres. indic. of Do. Dot ( dot ) [ A. S. dott, head of a boil; Dut. dot, a little bundle of spoilt wool.] n. टिंब n, पूज्य n, बिंदु m, शून्य n, लहान ठिपका m, चिन्ह n. D. v. t. शून्य-पूज्य देणे-मांडणे. २ (ला) खुणा करणे, (पृथक् पृथक् वस्तूंनी) खुणा करणे. D. v. i. टिंब n. देणे, ठिपके देणे. Dotted a. मध्ये मध्ये बिंदूप्रमाणे पदार्थ मांडलेला. २ bot. अंकित. Dotted pa. p. Dotting pr. p. Dot and go one नुकतेच चालू लागलेले मूल n. २ ज्याचा एक पाय दुसऱ्यापेक्षा अधिक लांब आहे असा मनुष्य m. Dotation (do-tā'-shun) [ Late L. dotatio-L. dotare, to endow-dos, dotis, dower. ] n, the act of