पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

another, without any consideration बक्षिस-इनाम देण्याची क्रिया f, किंवा करार m, खुषीने दिलेली देणगी f. Do'nary n. (R.) a thing given to a sacred use (ईश्वरार्पित देवास) वाहिलेली वस्तु f. Don'ative n. gift, present देणगी f, बक्षीस n. २ Eccl. a benefice conferred upon a person by the founder उपध्यायवृत्ति f. Dona'tor n. law. बक्षिस-देणगी देणारा. Don'atory n. (Scots-Law.) सरकारांत जमा केलेली बेवारशी मालमत्ता काही अटींवर ज्यास दिलेली असते तो मनुष्य m. Donee' n. ज्याला बक्षिस n, दान n. दिले आहे तो मनुष्य m. Do'nor n. बक्षिस देणगी देणारा. Donatis comet astron. डोनेटिस याने शोधून काढलेला धूमकेतु. हा इ. स. १८५७ मध्ये प्रथमतः फ्लोरेन्स शहरी डोनेटिस यांस २ जूनला दिसला. पुढे तो सप्टेंबरपर्यंत इतका तेजस्वी झाला की दुर्बिणीच्या साहाय्यावांचून तो सर्वांच्या दृष्टीस पडत असे. Done (dun) pa. p. of Do. केलेला, कृत. २ कबूल (केलेले). Doni ( do'-ni) [ Tamil toni. Sk. द्रोणी.] n. naut. एका डोलकाठीची नाव f- मचवा m. (कारोमांडल व सीलोनचे किनाऱ्यावर व्यापार करण्यांत यांचा उपयोग करितात.) Donjon (dun'-jun) [See Dungeon.] n. the chief tower किल्याचा मुख्य बुरुज m, किल्यांतील सैन्याच्या रक्षणाकरितां केलेला मजबूत भाग m. Donkey (don'-ki) [Probably dun, from the colour of the animal, and key, a diminutive termi. ] n. an ass गाढव, गर्दभ n & m, or (less frequently) a mule खेंचर n. २ a stupid fellow मूर्ख-जडबुद्धीचा मनुष्य m, गद्धा m, गधडा m (colloq.). D. ENGINE (दोनपासून चार घोड्यांची शक्ति आहे असें ) बाष्पपात्रामध्ये पाणी सोडण्याचे किंवा जड ओझी वैगरे उचलण्याचे एक लहान यंत्र n. D.-PUMP n. पाणी काढण्याचा-आग विझविण्याचा वगैरे वाफेनें काम करणारा वंब m. THE D. MEANS ONE THING & THE DRIVER ANOTHER निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मते असतात व ती तशी असण्याचे कारण स्वहित हे होय. TO RIDE THE BLACK D. गाढवासारखा आपलाच हेका धरणे, अडेल तट्टू होणे. Do-nothing (doo-nuth-ing) a. doing nothing, lazy आळशी, सुस्त, मंद. also n. Don't (dont) [Contra. of Do + not.] नको, नका. Donzel (don'-zel) [O. Fr. danzel, dopcel, dancel, young man. ] n. (obs.) a young gentleman not yet knighted, a squire, a page कुलीन-मोठ्या-सरदार घराण्यांत-कुळांत जन्मलेला पण अद्याप किताब न मिळालेला तरुण मनुष्य m, 'नाईट'चा नोकर m-चाकर m. Dooab. See Doab Doodle (doo-dl) n. a simple fellow साधा-भोळा-भोळसट मनुष्य m, भोलानाथ m. Dooly (dõõʻ-li) [ Sk. Dola, दोलe.] n. a kind of litter डोली f, डोळी f, दोली, पालखी f, मेणा m. Dooly-bearer n. डोली वाहणारा, डोलकर m, भोई m.