पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

property वतनी जमीन f. ४ law. ownership of land, patrimony which one has in his own right, absolute proprietorship जमिनीची मालकी f, स्वत:चे ताब्यात असलेली वडिलार्जित मालमत्ता f, अनियंत्रित मालकी f. [ PUBLIC D. (U. S.) सार्वजनिक उपयोगाची जागा f. EMINENT D. राज्यांतील सर्व जमिनीवर राजाची पूर्णसत्ता f- मालकी f.] Doma'inal, Doma'nial a. ताब्यांतील प्रांतासंबंधी. २ सत्तेसंबंधी. Dome (dom) [Fr. dome-It. L. domus, a house.] n. a house, an edifice, (chiefly in Poetry ) इमारत f-घर n. २ arch. a cupola formed on a large scale घुमट m, डेरा m, कळस m. ३ any erection resembling the dome or cupola of a building घुमटाकार रचना f, घुमटाकृति वस्तु f, घुमट m. Domed a. घुमट असलेला. Dom'ical a. घुमटाकार, घुमटाकृति. Domesday (doomz'da') [See Doomsday.] Dooms. day book-इंग्लंड देशचा राजा, पहिला वुइल्यम ह्याने केलेले इंग्लंड देशांतील एकंदर कुळंबाव्याचे नोंदणी-मोजणीबुक; ह्या बुकाचे दोन भाग असून त्यांत प्रत्येक ठिकाणाची 'कन्फेसर'च्या कारकीर्दीतील किंमत, वुइल्यमनें इंग्लंड देश काबीज केला त्या वेळची (इ. स. १०६६) किंमत व नोंदणीच्या वेळची (इ. स. १०८६) किंमत ही नमूद केलेली होती, व एखादा जमिनीच्या मालकीचा तंटा उपस्थित झाल्यास त्याचा निर्णय या नोंदणीबुकावरून करीत. हे पुस्तक विचेस्टर येथील देवळाच्या (Domus-dei) नांवाच्या भागांत ठेविलेले असे म्हणून त्यास (Domes-day-book) असें नांव पडले, असें Stow चे मत आहे. इतर कित्येक विद्वानांच्या मते ह्या शब्दाची उत्पत्ति (Dom bocs) ह्या शब्दापासुन झाली आहे. (Dom-bocs) म्हणजे पूर्वीच्या सॅक्सन राजांनी केलेल्या मोजण्या. Domestic (do-mes'-tik) [Fr. domestique-L. domus, a house.] a. pertaining to one's house or household, relating to home life प्रापंचिक, घरगुती, घरांतील, गृह्य, घरच्यासंबंधी. २ Pertaining to one's own country, intestine, not foreign स्वराष्ट्रातील, देशी, देशीय, स्वदेशान्तर्गत; as, " Foreign wars & D. dissensions." ३ remaining much at home, devoted to home duties गृहप्रिय लंपट-निमग्न, गृहासक्त, घर सोडून फारसा बाहेर न जाणारा, घरच्या व्यवहारांत सुख मानणारा, बायक्या (colloq.), घरकोंबडा, चुलकोंबडा. ४ living near the habitations of men, domesticated, tame माणसाळलेला, घरसंवईचा, पाळीव, पाळलेला, घरगुती, घराऊ (?). ५ made in one's own house, nation or country स्वदेशी, स्वदेशोत्पन्न, आपल्या देशांत तयार केलेला, देशी as, "D. manufactures &c." D. n. a hired household assistant, a house servant घरी ठेवलेला. घरचा-घरांतला चाकर m-नोकर m, कामकरी m, चरचाकर m, गडी m, कामकरीण f, गृह-भृत्य m-किंकर m. (S.) D. n. pl. (commerce) articles of some manufacture or produce, esp. (in U.S.)