पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बका m. Dog-watch n. संध्याकाळी चार ते सहा व सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत पहारा m. D on it शपथ वाहण्याची-घेण्याची एक पद्धत-तन्हा f. To give or throw to the dogs निरुपयोगी म्हणून टाकून देणे. To go to the dogs चुलींत-मसणांत जाणे, (-चा) सत्यानास-सत्यनाश m. होणे. They lead a cat & dog life ते नेहमी भांडतात. To lead the life of a dog नीचवृत्तीने आयुष्य क्रमणें. A surly dog n. चिडखोर मनुष्य m. Dogs of war लढाईतील संकटें n.(अन्नपाण्याची टंचाई, मनुष्यहानि वगैरे.) Dogs don't eat dog सरकारी पत्रांना टपालहांशील पडत नाही. २ देवळास दिलेल्या जमिनीवर दशांश बसला जात नाही. A black dog has walked over him तो अगदी उदास-खिन्न आहे A not in the manger n. एखाद्या वस्तूंचा आपण उपयोग न करितां दुसऱ्यासही घेऊं उपयोग करून देणारा मनुष्य m. Every D. has his day दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे; आज तुझे चांगले दिवस आहेत, उद्या माझे येतील. Gone to the dogs भिकेस लागलेला, धुळीस मिळालेला. He has not a dog to lick his feet त्याला कुत्रा देखील विचारीत नाही. Hungry dogs will eat dirty puddings भुकेला कोंडा n, "क्षुधा तुराणां न रुचिर्नवेला," भूक लागलेली असली म्हणजे दगड सुद्धा चालतात. Old dogs will not learn new tricks जुन्या चालीचे लोक नव्या चाली स्वीकारणार नाहीत. Throw, send, or give it to the dogs उकिरड्यावर फेंकून दे. To give a dog a bad name is hang him कोणाची नुकसानी करावयाची असेल तर आधी त्याची नालस्ती करावी. Dogged (doy'-ged) a. (obs.) & (R.) sullen, morose दुर्मुखलेला, खिन्न, सदाउदास. २ sullenly obstinate obstinately persistent पिच्छा न सोडणारा-पुरविणारा, निश्चयी, आग्रही, निश्चयाचा, हट्टी. Dog'gedly adv. निश्चयाने, नेटाने. Dog'gedness n. ( R.) उदासीनता f, खिन्नता f, दुर्मुखता f. २ आग्रह m, हट्ट m, नेटाचा निश्चय m. Doggerel, Doggrel (dog'-ger-el ) n. a sort of loose or irregular verse, mean or undignified poetry भिकार-कमी दर्जाचे काव्य n, हलकी कविता f. D. a. law in style & irregular in measure विषम व अधम. Doggy (dog'-i) a. कुत्र्यांचा शोकी. Dogma (dog'-ma ) [ Gr. & L dogma, a received opinion.] n. a doctrine, a tenet मत n, तत्व n. २ a formally stated & authoritatively settled doctrine अनुशासन n, आदेश m, प्रमाणवचन n. ३ an arbitrary dictum निरंकुश-अनिबंध-अनियंत्रित-दुराग्रहाचे मत n, (सत्य अथवा पुरावा यांजकडे लक्ष न देतां) प्रस्थापिलेले प्रतिपादित मत n, स्वतःच्याच जोरावर ठाकून दिलेले मत n. Dogmat'ic,-al a. स्थापित-सिद्ध मताविषयींचा. २ दुराग्रहाचा. ३ मताभिमानी, हटवादी, (दुराग्रहामुळे) निश्चयात्मक, हेकेखोर. Dogmat'ically adv. हटत्वादीपणाने. Dogmat'ics n. theol. the science which