पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

णा करणे; as, “ To D. whisky; to D. election returns.” D. v. i. (colloq. ) to practise physic वैद्यकी करणे. Doc'toral a. डाक्तर-डाक्तरीसंबंधी. Doc'torate v. t. to make (one) a doctor (ला) डाक्तर करणे, डाक्तरची पदवी देणे. D. n. also Doc'torship n. (विश्वाविद्यालयांतील) डाक्तरची पदवी f-हुद्दा m. Doc'torress or Doc'ress n. (R.) स्त्रीवैद्य f- डाक्तरीण f. Doctrinaire (dok-tri-naer) [ Fr. doctrine-L. doctrina, lore or learning-L. doctor, a teacher-L. docere, to teach. ] n. (orig. Fr. Hist. ) one of a political party which arose in France soon after 1815, ' having for their object & doctrine the establishment & preservation of constitution Government' &c. नियमबद्धराजसत्तावादी m. नियमबद्ध अशा राजसत्तेचे स्थापन व रक्षण व्हावे अशा मताचा फ्रान्समधील एक राजकीय पक्ष. हा १८१५ नंतर लवकरच उत्पन्न झाला. या पक्षांतील मनुष्यास D.असे म्हणत. 2 one who would apply to political or o practical concerns the abstract doctrines of theories of his own philosophical system (राजकीय किंवा इतर व्यावहारिक गोष्टींत) आपल्याच तत्त्वज्ञानाची काल्पनिक मतें लावणारा, स्वमताग्रही m. २. a propounder of a new set of opinions नवीन मते पादन करणारा-स्थापू पाहणारा मनुष्य m. ३ dogmatic theorist हटवादी-स्वमताग्रही मनुष्य m. Doctrina'rian n. Same as doctrinaire, Doctrina'rianism n. हटवाद्यांची तत्वे n- मतें n. Doctrine (dok'-trin ) [ Fr. doctrine-L. doctrina- doctor-docere, to teach.] n. teaching, instruction शिक्षण n, शिक्षा f (S. ), उपदेश m, बोध m. २ that which is taught, any tenet or dogma, a principle of faith (प्रतिपादित) मत n- सिद्धांत m-वाद m. Doc'trinal a. शिक्षणासंबंधी, उपदेशासंबंधी. २ सिद्धान्तासंबंधी. D. n. a matter of doctrine उपदेश-शिक्षणविषयक m. २ a system of doctrines सिद्धान्तसंग्रह m. Doc'trinally adv. शिक्षणाच्या-मतांच्या रूपाने. [THE MONROE DOCTRINE (Politics) अमेरिकेचा प्रेसिडेन्ट याने इ० स० १८२३ दिसेंबर २ रोजी प्रतिपादन केलेले मत n. या मताचा सारांश हाच की, कोणत्याही युरोपिअन राष्ट्राचे अमेरिका खंडात राज्यविस्तार करण्याचे किंवा युनायटेड स्टेट्सनी संस्थानाचे स्वातंत्र्य कबूल केले आहे अशा सस्था कारभारांत ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न हे त्या राष्ट्राने शत्रुत्वाचे भावाने केले असें युनायटेड स्टेट्स समजतील.] Document ( dok'-ū-ment j [ Fr. document-L. documentum, & proof-L. docere, to teach. या शब्दाचा मूळ अर्थ (a) उपदेश, शिक्षण, ( उदाहरण, इशारत असा होता; जसे, "They stoned to death as & D. to others.” ] n. that which serves to show, point out, or prove something; evidence, proof पुरावा m, दाखला m. २ something written, inscribed, &c. which furnishes