पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारांश m, थोडक्यांत दिलेली माहिती f- हकीकत f, सूचिपत्र n (?), अनुक्रमणिका f (?). २ a bill tied to goods containing some direction as the name of the owner &c., a label (मालाबरोबर बांधिलेली) तपशील-चिठ्ठी f, अंकपट्टी f, or आंखपट्टी f (?), बिजक n. ३ law. (a) a register of entries of judgments or proceedings in actions कोर्टीतील निकाल लागलेल्या मुकदम्यांची नोंद f. (b) a list of causes ready for hearing or trial (कोर्टापुढें) चौकशीकरितां निघणाऱ्या खटल्यांची यादी. ४ a list of business matters to be acted on in an assembly (सभेत येणाऱ्या-निघणाऱ्या) विषयांची कामाची यादी f, सभेने करावयाच्या कामाची यादी f. [ ON THE D. (colloq.) हातांत-हाती घेतलेली-धरलेली (गोष्ट f.) चालू असलेली (गोष्ट.f.), चालू, विचारांत.] D. v. t. to summarise (चा) गोषवारा काढून लिहिणे, (कागदावर विषयाची) अनुक्रमणिका वगैरे लिहिणे. २ to mark with a ticket (मालावर) अंकपट्टी-आंखपट्टी लावणे. ३ law. निकाली खटल्यांचा गोषवारा लिहिणे. (b) चौकशीस निघणाऱ्या खटल्यांची यादी तयार करणे. Dock'eted pa. p. a. Doctor ( dok'-ter) [L. doctor, teacher-docere, to teach. ] n. (obs.) a teacher शिक्षक m, गुरु m. (a) an academical title ( orig. meaning a man so well versed in his department as to be qualified to teach it) तीर्थ (s.) m, आचार्य m- शिक्षक m- गुरु m. होण्यास लायक-पात्र असण्यासारखी विद्वत्ता f- ज्ञान 1n. ज्याचें आहे असा मनुष्य m. Hence (b) one who has received the diploma of the highest degree (विश्वविद्यालयांतून ज्याला) उच्चतम पदवी f- सनद f- डाक्तर ही पदवी-किताब मिळाला आहे असा पुरुष m; as, "A. D. of divinity, of law, of medicine, of music, of philosophy.” २ one duly licensed to practise medicine, a physician वैद्यकी करण्याचा परवाना मिळविलेला मनुष्य m, वैद्य m, डाक्तर m, चिकित्सक m, हकीम m. 3 (mech.) any mechanical contrivance intended to remedy a difficulty or serve some purpose in an exigency ( एखाद्या मोठ्या यंत्रांतील ) अडचण-नड-भानगड दूर करण्याकरिता किंवा एखादें कार्य घडवून आणण्याकरितां केलेली यांत्रिक योजना f, उपकारकयंत्र n. [ THE DOCTOR OR AUXILIARY ENGINE IS ALSO CALLED Donkey-engine; ] Doctor's Stuff n. औषध n, दवा m, बुट्टी f. Doctor-fish n. एकजातीचा मासा m. D. v. t. (colloq.) to treat as a physician does, to apply remedies to, to repair (डाक्तरा-वैद्याप्रमाणे) उपायजोपासना करणे, दुरुस्त-नीट करणे, औषध देणे, औषधोपचार करणे; as, "To D. a sick person or a broken cart.” २ to make a doctor डाक्तर करणे, डाक्तर ही पदवी देणे. ३ (slang.) to tamper with & arrange for one's own purposes, to falsify, to adulterate भेसळ करणे, खोटें मिश्रण करणे, बनावट करणे, दुसऱ्या पदार्थात मिसळणे, (आपमतलबाकरितां) ढवळाढवळ करणें, नीचप.