पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रियांच्या स्तनाला काठिण्य आणण्याकरितां औषधाप्रमाणे लावीत असत. Dock (dok) [ From dock (noun), the stump of a tail, stump, cut end. ) v. t. to cut off (as the end of a thing), to curtuil, to cut short, to clip (-चें) शेवट n- अग्र n- टोंक n- शेंडा m. कापणे, लांडा-तोकडा करणे, कापणे, छाटणे, कापून आंखूड करणे. २ to cut off a part from, to deduct from तोडणे, कापणे, कमी करणे; as, “ To D. one's wages." ३ to cut off, to bar, to destroy बंद-बंदी करणे, नाश करणे, as, "To D. an entail." D. n. the solid part of as animal's tail, the stump of a tail शेपटीचा दांडा m, शेपटाच्या बुध्याचा भाग m. २ a case of leather to cover the clipped tail of a horse घोड्याच्या कापलेल्या शेंपटीवर आच्छादन टाकण्याची कातड्याची पिशवी f- पेटी f, शेंपपेटी f. Dock'er n. घोड्यांच्या शेपट्या कापणारा. Dock (dok) [ M. Dut. docke, a harbour.] n. an artificial basin or inclosure in connection with a harbour or river गोदी f, गलबतें उभी करण्याकरिता मुद्दाम तयार केलेली जागा f. २ the water way extending between two pier's दोन धक्क्यांचे मधील गलबतें जाण्यायेण्याचा जलमार्ग m. ३ the place in court where a criminal of accused person stands (आरोपीला उभा करण्याची) न्यायगृहांतील-कोर्टीतील जागा f, पिंजरा m- कठडा m. Dry D. सुखी गोदी f, गलबतें आंत घेतांना पाणी आंत घेता येईल किंवा बाहेर सोडता येईल अशा सोईची गोदी f. Floating D. तरती गोदी f, तरंगत राहून जहाजास पाण्याबाहेर करणारी गोदी f, धक्का m. Graving-D. जहाजांचा पठाण साफ करण्याकरितां बांधिलेली गोदी f. Hydraulic D. पाण्याच्या दाबाने जहाजे उचलण्याची गोदी f. Screw D. स्क्रूने गलबत उचलण्याची गोदी f. Sectional D. जहाजाचा विशेष भाग साफ करण्याकरितां बांधिलेली गोदी f. Slip D. उतारावर जहाज घेऊन वर ओढण्याची गोदी f. Wet D. ज्यांत जहाज केवळ तरंगत राहू शकेल इतकें पाणी असलेली गोदी f. अशाने माल चढविण्यास व उतरण्यास सोपे जाते. D. v. t. (दुरुस्तीकरितां गलबत, जहाज, बोट वगैरे) गोदीत घेणे. Dock'age n. गोदीचें भाडें n. २ गलबतांची गोदीतील सोय f. Dock'er t. (a) गोदीत राहणारा मनुष्य m. (b) गोदीत काम करणारा मनुष्य m. Dockmaster n. the superintendent or the manager of a dock गोदीवरचा पाहणी करणारा मुख्य अंमलदार m. Dock warrant n. गोदीत ठेवलेल्या मालाबद्दल मालकास दिलेली पावती f, खन्ना (?). Dock-yard n. जलमार्गाचे उपयोगाचें सामान-सुमान वगैरे ठेवण्याकरिता केलेली बंदराजवळची जागा f- गोदी f. २ नौकानिर्माणस्थान n, डाक्यार्ड n. Docket ( dok'-et) [Dock, to cut off & dim. suffix et, origin obscure. ] n. a brief summarised statement, an abstract, a summary विषयनिर्देश m,