पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

separated, to keep apart by partition वेगळा-भिन्न-अलग-निराळा-स्वतंत्र ठेवणे करणे. ३ to apportion, to give in shares, to distribute, to mete out वांटणे, वांटून देणे-घेणे, विभागणे, विभागून देणे-घेणे, (चे) हिस्से पाडणें-वांटून देणे-घेणे. ४ to disunite in opinion or interest, to set at variance मतभेद पाडणे, फुटाफूट-फाटाफूट करणे, दुही माजविणे, दुफळी पाडणे, (ची) तोंडे विरुद्ध फिरविणे. ५ to separate into two parts in order to ascertain the votes for & against a measure (एखाद्या गोष्टीचे बाजूस किंवा विरुद्ध किती मते पडतात ते पाहण्याकरितां) दोन पक्ष करणे. ६ math. to subject to arithmetical division (-ला) भागणे-भाग देणे -भाजणे, (चे) विभाजन करणे. ७ log. to separate into species (च्या) पोटजाती पाडणे -करणें-सांगणे. ८ mech to mark divisions on, to graduate (वर) भागदर्शक खुणा करणे, भाग आंखणे-पाडणे. D. v. i. to be separated, to part, to go asunder. (चे) भाग पडणे, वेगळा होणे . २ to cause separation ((चा) संबंध तोडण्यास कारण होणे. ३ to break friendship, to fall out (-ची) मैत्री f, स्नेहसंबंध m. तुटणे, (च्यांत) वैमनस्य येणे. ४ to vote by the members separating themselves into two parties दोन बाजू-पक्ष-तट करून मत देणे. ५ (Shakes) to have a share, to partake हिस्सा मिळवणे, भाग घेणे. Divid'able a. भाग करण्यास योग्य. २ विभाजनीय. Divided'ly adv. Divid'er n. one that divides भाग पाडणारा, भेदक, छेदक, भेदणारा, छेदणारा, विच्छेदकर्ता-कारक. २ one who deals out to each his share वांटे पाडणारा, वांटणारा, वांटून देणारा. ३ one who, or that which, causes division भेद-फूट-तट पाडणारा. ४ math. भाजक, भागणारा. ५ pl. an instrument for dividing lines, describing circles, &c. compasses रेषांचे भाग पाडण्याचा अगर वर्तुळे काढण्याचा कैवार m, भाग पाडण्याचा कंपास m. Divid'ing a. भाग पाडणारा, भागदर्शक. २ भेदक चिन्ह करणारा, विभक्त करणारा. [D. ENGINE n. वर्तुळाचे अथवा रेषेचे सारखे भाग पाडणारे यंत्र n.] Divi'dual a. (R.) divided or shared in common with others (आपल्याबरोबर दुसऱ्यांचा भाग काढून) सारखे वाटून घेतलेले. Divid'uous a. (R.) वांटलेले, विभागलेले. Divided circuits phys. विभक्त मंडल. Dividend ( div'-i-dend) [L. dividendum-L., dividere, to divide. ] n. a sum of money to be distributed वाटून घेण्याची रक्कम f. २ the share of a sum divided that falls to each, a distributive share वांटा m, भाग m, हिस्सा m, (व्याज इत्यादिकाचा) हिस्सेरशीने आलेला भाग m. ३ math. a number or quantity which is to be divided भाज्य m,'भाज्यांक m. Divine (di-vin') [M. E. devin-O. Fr. devin- L. divinus, divine, allied to divus, godlike-deus, god. of. Sk. , देव, god.] a. belonging to or proceeding from God ईश्वरी, ईश्वराचा, देवाचा, दैविक. २