पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा रीतीने) धढाक्याने फुटणे-उडणे. Displo'sion n. दारूचा धडका n. Displo'sive a. Displume ( dis-ploom' ) [O. Fr. desplumer-Fr. deplumer-L. dis & Plume.] v. t. to deprive of decoration, to dishonour, to degrade (ची) शोभा हरण करणे, (ची) शोभा करणे (fig.), अपमान m. करणे, योग्यता f- किंमत f, कमी करणे. Disport ( dis-pawat') [ M. E. disporten, to amuse-O. Fr. se desporter, to amuse one's self-L. dis, away & portare, to carry ( hence to remove one's self from labour. ] v. t. to divert, to amuse, to make merry खेळवणे, रमवणे, (चें) मनरंजन करणे, (ची) करमणूक करणे. २ to remove from a port, to carry away (बंदरांतून) काढून नेणे-बाहेर काढणे, घेऊन जाणे. D. v.i. to play खेळणे, रमणे. D. n. खेळ m, विहार m, क्रीडा f, गंमत f, मजा f, करमणूक f. Dispose ( dis-põz') [ O. Fr. disposer, to arrange-:O. Fr. dis (L. dis), apart & Fr. poser, to place. See Pose. ] v. t. to set in order, to arrange मांडणे, व्यवस्था करणे, रचणे, थाटणे, लावणे, रचना f-मांडणी f. करणे, नीटनेटके करणे. २ to regulate, to adjust, to settle व्यवस्था लावणे, निकाल लावणे, नक्की करणे. ३ to deal out, to assign to use, to bestow for an object, to apply (च्या) कामास-कामी लावणे, (च्या) कारणी लावणे, वासलात-व्यवस्था लावणे, (च्या) उपयोगार्थ देणे, विशिष्ट हेतूकरितां देणे. ४ to give a tendency or inclination to, to incline (चें) मन वळविणे, (ला) वळविणे, (च्या) मनाला वळण लावणे-देणे, (ला) प्रवृत्त करणे. Dispo'sable a. विल्हेवाट लावता येण्याजोगा. Dispo'sal n. an arrangement रचना f, व्यवस्था f, मांडणी f. २ adjustment, management विशेष रचना f, व्यवस्था f, रचाई f. ३ the transference of anything into new hands, alienation नवीन माणसाचे ताब्यांत जाणे n, विल्हेवाट f, निरवानिरव f, सोंपवासोपव f. ४ the power to dispose of (esp. in the phrase at or in the disposal. of ) (कोणत्याही गोष्टीचा) निकाल लावण्याचा उपभोग घेण्याचा अधिकार m. Disposed' a. कल-हेतु असलेला, &c. Disposed'ly adv. Dispos'er n. व्यवस्था-विल्हेवाट-निकाल लावणारा. २ नियामक, नियंता. ३ दाता. Dispos'ing pr. p. Dispos'ingly adv. [To DISPOSE OF to determine the fate of (चा) सोक्षमोक्ष ठरविणे, एखाद्या वस्तूचे अखेर काय करावयाचे हे ठरविणे, (चा) निकाल करणे-ठरविणे, (ची) निर्गत लावणे. २ (ची) व्यवस्था-वासलात-विल्हेवाट लावून मोकळे होणे.] Disposition (dis-po-zish -un ) [Fr. disposition-L. acc. dispositionem, a setting in order-L. dispositus pa. p. of disponere, to set in various places, to arrange-L. dis, apart & ponere, to place. ] n.-act. व्यवस्था करणे n-ठरविणें n, देऊन टाकणे n, विल्हेवाट करणे n, &c. २ arrangement, order व्यवस्था f, रचना f, मांडणी f, मांडणूक f. ३ tendency to any