पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

others संपत्तीचे दान करणे, आपल्या संपत्तीचा दुसऱ्या सह उपभोग घेणे, आपल्या ऐश्वर्यात दुसऱ्यास भागीदार करणे; as, "He hath dispersed, he hath given to the poor." Disper'sal n. पसरण्याची क्रिया f. Dispersed' a. उडवलेला, पसरलेला, परागंदा, रानोमाळ झालेला. Dispersedly adv. इतस्ततः, तजावजा. Dispersed'ness n. Dispers'er n. Dispers'ive a. प्रसारणशील, विकिरणशील. Dispersion ( dis-per'-shun) [ See Disperse. ) n.-act. उडविणे n, फांकवणे n, फांकणे n, पांगणे n- stats. उडवाउडव f, फांकाफांक f, वाताहत f, पांगणी f- [GENERAL D. पांगापांग OR गी f.] २ med. सूज उतरणे-कमी करणे , गोठलेले रक्त फांकणे n. ३ optics. separation of light into its different coloured rays (प्रकाशाचे पृथक) विकिरण करणे n. [ DISPERSION OF LIGHT प्रकाशविस्पर्शन n, प्रकाशविकिरण n. ] Dispirit ( dis-pir'-it ) [ L. dis & Spirit. ] v. t. to deprive of cheerful spirits, to dishearten, to discourage धीर-कंबर खचविणे, हिरमोड करणे, धैर्यभंग करणे, उदास-खिन्न-खट्टा-निरुत्साह करणे, नाहिंमत करणे, हर्षभंग करणे. Dispir'ited a. उमेद-छाती खचलेला, उदास, निरुत्साह, गतोत्स. Dispir'itedly adv. Dispir'itedness n. औदासिन्य n, विषण्णता f, निर्विपणता, नाउमेद f· Dispir'iting a. हिंमत खचविणारा, हिरमोड करणारा, निरुत्साह करणारा. Dispiteous (dis-pit'-e-us) [ See Despite. ] a. crual pitiless क्रूर, निष्ठर, निर्दय, पाषाणहृदय. Displace ( dis-plās') [ L. dis & Place. ] v. t. to change the place of, to move from the usual or proper place, to put out of place स्थानच्युत-स्थलभ्रष्ट करणे. २ to crowd out, to take the place of ( च्या जागी घुसल्यामुळे) एकीकडे सरावयास लावणे, ज्या जाऊन बसणे, (ची) जागा घेणे,-पडकावणे-मारणे. as, "Holland displaced Portugal as the mistress the seas." ३ to remove (from a state, office, dignity or employment ), to discharge, to depose पदभ्रष्ट-स्थानभ्रष्ट-अधिकारनष्ट करणे, (कामावरून दूर करणे-काढून टाकणे, काढून लावणे. ४ (obs.) to dislodge drive out, to banish आश्रयाच्या जागेपासून हुसकून लावणे-देणे हद्दपार करणे, नाहींशी करणे. Displaced' a. स्थानध्यूत, भ्रष्ट. Displace'ment n-act. स्थानध्युत करणे n -state. chem. & math. स्थलध्युति f, स्थानान्तर n. २ med. मोतीबिंबाचे स्थलांतर n- स्थलांतर. (b) ओषधी- वनस्पतींतून सत्व काढण्याची क्रिया f. ३ the quantity or weight of a fluid displaced by a floating body तरंगत्या (गलबताने) पदार्थाने बाजूस सारलेले पाणी n. [BY DISPLACEMENT METHOD आंगतुक रीतीने.] Displa'cer n. (ची) स्थानच्याुति करणारा. २ chem. स्थानच्युतिकर्ता. Displant (dis-plant') [ L. dis & Plant ] v. t. to remove ( what is planted fixed), to displace