पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३ to deal with, in eating or in drinking (दुसऱ्यास बरोबर घेऊन एखादी वस्तु) खाऊन-पिऊन टाकणे; as, "We D.ed a bottle.” ५ law. to examine or search thoroughly निरनिराळ्या साधकबाधक प्रमाणांचा विचार करणे, शिकस्त-फोड-छाननी करून पाहणे. Discuss'able a. विचार करायाजोगा. Discus'sion n. वादग्रस्तचर्चा f, वादविवाद m, वाटाघाट f, मंथन n, खल m, मुद्देसूदनिरूपण n. २ surg. गळूं निचरणे n. Discuss'er n. Discuss'ive, Discu'tient a. (med.) दुष्टधातुनाशक, नासलेले रक्त काढून टाकणारें. Discu'tient n. गळूं बसण्याचे किंवा निचरण्याचे औषध n. Disdain (dis-dān') [M. E. disdeyn-O. Fr. desdain-O. Fr. desdegnier-L. dedignari, to disdain. Disdain शब्दाचा धात्वर्थ अयोग्य-अप्रशस्त मानणे असा आहे.] v. t. to reject as unworthy of one's self, to scorn ( एखादी गोष्ट आपल्यास अनुचित म्हणून ) धिक्कारणे, (अतिक्षुद्र म्हणून) दुर्लक्ष करणे, तुच्छ-हलका मानणे-समजणे, कसपटाप्रमाणे मानणे, अव्हेर करणे, ताठयाने-ऐटीने धिक्कारणे, (बेपर्वाईनें क्षुद्र म्हणून) तिटकारा करणे. D. v. i. to be filled with scorn, to be haughty, to feel contemptuous anger (चा) तिरस्कार वाटणे, ताठा असणे, उर्मट-उद्दाम असणे, (चा) तिरस्कारयुक्त क्रोध येणे. D. n. a feeling of contempt to aversion तिरस्कार m, अवज्ञा f, अवगणना f, अनादर m, तिटकारा m. Disdain'ful a. तिरस्कारपूर्ण, अनादरदर्शक, उद्धट, मगरुरी. Disdain'fully adv. Disdain'fulness n. मगरूरी f, दिमाख m, ताठा m. Disease (diz-ēz') [O. Fr. desaise, want of ease-O. Fr. des. (L. dis) & aise, ease.] n. (obs.) सुखाभाव m, असुख n, अस्वाथ्य n, दुःख n. २ malady, illness, sickness दुखणें n, विकार m, रोग m, व्याधि f, पीडा f, विकृति f, आजार m. [ ADDISON'S D. सूत्रपिंडाला लागून त्याचे वरचे बाजूस एक उपमूत्रपिंड (SUPRARENAL BODY ) म्हणून इंद्रिय असते त्याचा रोग m. AN INHERITED OR A CONNATE D. पिढीजाद रोग m, आईबापापासून झालेला रोग m, जन्माचा रोग m, आनुवंशिक सहज रोग m. BRIGHT'S D. मूत्रांतून (अलवूमेन) श्वेतकल्क निघून जाणे, मूत्रपिंडदाह m, मूत्रपिंडाला सूज येणे. CURE OR ALLEVIATION OF D. रोगशांति f, रोगोपशम m, रोग बरा होणे n. D. OF THE NOSE नासारोग m, नाकाचा रोग m. D. OF SYNOVIAL BURSEA सयानो व्हिअल वर्सि नामक पिशव्यांचा विकार m. D. GERMS IN THE AIR हवेतील व्याधिबीजजंतु-रोगजंत. ] D. v.t. (obs.) दुःख-त्रास देणे, संकट आणणे. २ आजारी पाडणे. Diseased a. रोगी, रोगट, रोगग्रस्त, दुखणेकरी, आजारी, रुग्ण. [D. MIND अस्वस्थमन n. ] Disedge ( dis-ej) v. t. ( Shakes. ) मंद-बोथट करणे, तीव्रता-धार काढून टाकणे. Disedify (dis-ed'-i-fl) v. t. परमार्थबुद्धि उडवुन टाकणे, सन्मार्गनिष्ठा f, धर्मनिष्ठा कमी करणे.