पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Discard (dis-kārd') [L. dis & Card. Here the prefix dis has the sense of rejecting or throwing out (a card ) from the hand. ] v. t. & v. i. to throw out or reject from the hand (गंजिफाची फालतू पाने) हातांतून फेंकून-टाकून देणे. २ to cast off as useless, to dismiss from employment, confidence or favour, to discharge, to turns away (निरुपयोगी म्हणून चाकरीवरून) काढून टाकणे, (विश्वासांतून-मर्जीतून) दूर करणे, हाकून देणे. ३ to reject सोडून देणे, त्याग करणे, टाकून देणे, झुगारून देणे, काढून टाकणे. D. n. (पान) फेंकून देणे n. २ फेंकून दिलेले पान n. Discar'ded a. टाकून दिलेला, दूर केलेला, काढून टाकलेला, मर्जीतून उतरलेला. Discard'er n. फेंकून देणारा, झुगारून देणारा. Discard'ment n. Discern ( diz-zern') [Fr. discerner-L. discernere-L. dis, apart & cernere, to distinguish. ] v. t. to see & identify by noting a difference, to note the distinetire character (आंतील) भेद समजणें-ओळखून काढणे-जाणणे, (चा) विशेष धर्म ओळखणे, वेगळे-बाजूस काढणे, अंतर n- भेद m. पाहणे-ओळखणे-जाणणे. २ to see by the eye or understanding, to perceive & recognize (चर्म-ज्ञानचक्षूनी) भेद पाहणे-समजणे, मर्म जाणणे. Discern'er n. भेद ओळखून काढणारा, सूक्ष्म पाहणारा. Discern'ible, Discern'able a. ज्याचा भेद किंवा मर्म किंवा स्वरूप ध्यानांत येते असा (पदार्थ), सूक्ष्म रीतीने ओळखतां येण्याजोगा, ज्ञेय, दृश्य; as, “ Stars are D. by eye." Discern'ibleness n. Discern'ibly adv. Discern'ing a. acute, shrewd, sagacious, sharp-sighted बारीक-तीक्ष्ण नजरेचा, शहाणा, सूक्ष्मदर्शी. Discern'ingly adv. Discern'ment n.-act. भेद ओळखणें n. २ penetrative & discriminative mental vision, sagacity in sight ओळखून काढण्याची-भेद जाणण्याची शक्ति f, विवेक m. (S.), तीव्रबुद्धि f, समज f, भेदकवुद्धि

f. 

Discharge ( dis-chärj') [O. E. deschargen, dischargen-O. Fr. deschargier-I'r. descharger-L. dis & charger, to load. ] v. t. to relieve of a charge, load or burden, to unburden, to unload (वरचे ) ओझे उतरणें, भारमोचन करणे, (ओझे काढून) रिकामारिता करणे, खाली करणे; as, “ To D. a vessel." २ to free of the missile with which anything is charged or loaded, to let go the charge of (बंदूक, पिस्तूल वगैरेंतील ) बार झाडून टाकणे. ( b.) to relieve from a state of tension ताण-ओढ ढिला करणे. (c) elec. निर्जागृत करणे. ३ to relieve of something weighing upon one (as debt, claim, obligation &c.) (ऋण-हक्क इ० पासून) भारमुक्त करणे, मुक्त करणे, मोकळे करणे. ४ to relieve of an office of employment, to dismiss (चा) अधिकार काढून घेणे, (ला) नोकरीतून कमी करणे, काढून टाकणे, बडतरफ करणे. ५ to release legally from confinement, to set at liberty (कायदे-