पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1088

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

stone-buildings (हयगयीने) मोडकळीस आणणे, मोडीस-पडीस आणणे, शोभा नाहीशी करणे. २ ४ to ruin खराबी करणे, उधळमाधल करणे. D. v. i. मोडकळीस येणं, भोडजें, नादुरस्त होणे. Dilap'ida'ted a. मोडकळीस आलेला, मोडावलेला, मोडका, पडका, पडित. Dilap'ida'tion n. मोडती कळा f, पडती दशा f, पडझड f. २ देवस्थानच्या मालमत्तेची नासाडी f- खराबी f. करणे n. ३ law. इमारत पाडणें-पडू देणे नासधूस होऊ देणे. Dila'pida'tor n. मोडकळीस आणणारा. Dilate (dr-lat')[O. Fr. dilater, to widen-L. dilatare-L. di (dis, ) apart & latus, broad. Dilate denotes an increase of bulk on all sides and generally applies to hollow bodies.] v. t. lit. & fig. to expand रुंदट करणे, रुंदावणे, पोकळी f. वाढविणे, विस्तार करणे, विस्तारणे. २ ( Shakes.) to enlarge upon, to, relate at large (पुष्कळ शब्दांनी) फुगवून सांगणे, पाल्हाळाने सांगणे, फुगवणे, शब्दप्रपंच करणे. D.v.i. to expand, to swell or extend in all directions फुगणे, रुंद होणे, फुलणे. २ ( with on or upon) to speak largely and copiously अतिविस्ताराने सांगणे-बोलण, पाल्हाळ लावणे. Dila'tabil'ity n. रूंदट होण्याची-फुगण्याची पात्रता f, प्रसरणशीलता f. Dilat'aney n. Dila'tion n. फुगवणे, प्रसारण n, प्रसरण n. ( loosely), प्रसुति f, विस्तार m, प्रसार m, फैलावणी f, शब्दप्रपंच m, फैलावा m. २ surg. शरीरांतील शिरा किंवा इंद्रिये यांचे फुगणे n- रुंद होणे n, स्फीति f. ३ विकासन n, प्रफुल्लता f. Dilat'able a. फैलावणी करण्यास योग्य, फुगण्याजोगा. Dila'tant a, Dilata'tive a. प्रसरणयोग्य. Dil'ata'tor, Dila'ter-or n. रुंदट करणारा, प्रसरण पावणारा-करणारा. २ तोंड किंवा विवर रूंदट करणारे यंत्र n. [UTERIC D.med. योनिमुख रूंद करण्याचे रबरी यंत्र n.] Dilata'tor n. muscle which expands or dilates a part रुंदट करणारा स्नायू m, रूंदावणारा स्नायू m. Dil'atom'eter n. an instrument for dilating or distending an opening प्रसरणयंत्र n. Dilatory ( dil'-a-ter-i) [ See Dilate. ] a. inclined to defer or put off what ought to be done at once detaining, loitering ( said of persons ) रेंगाळणारा. लांवण-सुस्त-वेळ लावणारा, टंगळमंगळ-उशीर करणारा. चेंगट, दिरंगाईनें काम करणारा, दीर्घसूत्री, विलंबी.२ marked by procrastination or delay, tardy, Slow ( said of actions and measures ) चेंगटपणाचा, दिरंगाईचा, चेंगट, मंद, थिल्लर. (R.) [D. PLEA law खटला लांबणीवर टाकण्याकरितां पुढे आणलेली सबब f.] Dil'atorily adv. उशीराने, वेळ करून, उशीर करून. Dil'atoriness दीर्घसूत्रीपणा m, चेंगटपणा m, दिरंगाई f, मंदपणा m. मंदता f, कालहरण n, कार्यजडता f. Dilemma (di-lam-ma) [L. dilemma-Gr. dilemma, a double proposition or argument in which one is caught between two difficulties.---Gr. dis, twice