पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1086

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोटांचा उपयोग केला जातो यावरून बोटाचा वाचक जो DIGIT शब्द तोच आंकड्याचाही वाचक झाला आहे. कित्येक लोक शून्यास DIGIT मानीत नाहीत. कारण मोजताना शून्यापासून सुरुवात करून बोटें न घालता एका पासूनच ती घालण्याचा प्रघात आहे. ] ४ astron. one twelfth part of the diameter of the sun or moon (a term used to express the quantity of an eclipse ग्रासस्थानाडू, अकांश m, चंद्रांश m, कला f, चंद्रकला f, इन्दुरेखा f, इन्दुदल n, सूर्याच्या व्यासाचा बारावा भाग m; as, "An eclipse of eight digits is one which hides two-thirds of the diameter of the disc." D. v. t. (R.) to point at or out with the finger (कडे) बोट करणे, बोटांनी दाखविणे, अंगुलिनिर्देश करणे. Dig'ital a. of or pertaining to the fingers or to the digit आंकड्या-बोटासंबंधी. २ done with the fingers बोटांनी केलेले. Digit'lia, Dig'italine, Dig'italin n. 'रानहवरी'सारख्यांतील कार्यकारी द्रव्य n. Digita'lis n. एक प्रकारचे रोपटें n. Dig'itate-d a.पांचदळे-पाने असलेला, पंचदल, पंजाच्या आकाराचा. Dig'itately adv Digʻitā’tion n. a division into fingers or fingerlike processes बोटासारखे विभाग होणे n. Digiti'form a. bot. बोटाच्या आकाराचा, अंगुल्याकार. Dig'iti-grade or walking on the toes (तळवे जमिनीस न लावता) फक्त बोटांवर-आंगठ्यावर चालणारा, [तळपाय जमिनीस लावून चालणाऱ्या प्राण्यास Plantigrade असें म्हणतात; जसे, अस्वले, माणसें इ०] Dig'itigradism n. बोटांवर चालणाऱ्या प्राण्यांची स्थिति f-धर्म m. Digito'rium n. पेटी वाजवावयास शिकणारे लोक बोटांना सराव करण्याकरिता ज्याचा उपयोग करतात असा न वाजणारा पट्टयांचा तक्ता m, मुकीपेटी f. Digladiation ( di-glä'-di-a'shun) [L. digladiare; di (dis), apart and gladius, a sword.] n. (obs.) तरवारीची लढाई f. Dignify (dig'ni-fi) [o. Fr. dignifier-Med. L. dignificare-L. dignus, worthy and facere (ficare ), to make.]. v. t. to invest with dignity, honour, to give distinction to, to exalt in rank मोठेपणा m- थोरपणा m-महत्व n- शोभा f. आणणे-देणे, मानास-प्रतिष्ठेस-पदवीस-थोरवीस चढविणे, पदवी f- प्रतिष्ठा f. वाढविणे. २( in lighter use ) to represent worthier than it is, to give a high-sounding name on title उगाच फाजील भपक्याचें नांव देणे. Dignifica'tion n. पदवसि-मानास चढविणें n, &c. &c., सन्मान m, गौरव m, महत्व n, मानवृद्धि f, प्रतिष्ठा f. Digni'fied a. प्रतिष्ठेस चढविलेला, मोठेपणाचा, थोर, मान्यतेचा, श्रीमंती, श्रीमंतीडौलाचा, गौरवाचा. Dignity (dig'-ni-ti) [M. E. dignitee-O. Fr. dignets-L dignitatem-L. dignus, worthy.] n. the state of being worthy or honourable थोरवी f, थोरपणा m, मोठेपणा m, अब्रू f, मान्यता f, प्रौढी f. २ elevation of mind or character मानाचा मोठेपणा m-थोरपणा m,