पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1085

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

odically in the mind. (विचार करून पद्धतशीर रीतीने) मनांत रचून जुळवून ठेवणे, (b) मननाने जिरविणे, भिनवणे, (एखादा विषय) मननाने जिरवून-पचवून टाकणे, समजणे. ४ to appropriate for strengthening and comfort (मनाच्या शांति-समाधानाकरिता) स्वीकार करणे, आध्यात्मिक पोषणाकरितां-धर्मबळाकरिता उपयोग करणे, (चा) मनांत परिपाक करणे, हृदयांत भिनविणे; as, "Grant that we may D. the scriptures." ५ to bear comfortably or patiently, to be reconciled to, to brook सहन करणे, सोसणे; as, "i never can D. the loss of &c. &c.” ६ to expose to gentle heat, to soften by heat and moisture ओली आंच देणे, वाफ देऊन नरम-मऊ करणे. ७ to dispose, to suppurate or generate healthy pus पिकवणे, पुवळणास येईसें करणे. ८ (obs.) to ripen, to mature पिकवणे, परिपक्व करणे; as, “Well-digested fruits." ९ to quiet or abate शमविणे, शांत करणे; as, "To D. anger or grief." D. v.i. पचणे, पचन होणे; as, "Food D.s well or ill." २ to generate pus पू येणे, पिकणे, पुवळणास येणे. D. v. t. Diges'ted p. p. (उपयोगाच्या सोईसाठी) क्रमवार रचलेला, पचवलेला, पचनी पडलेला: Diges'tedly adv. योग्य रीतीने, व्यवस्थितपणाने. Diges'ter n. पचवणारा m. २ पाचक (औषध) n, पाचकद्रव्य n. ३ a chemical vessel for softening bones or other substances by means of great heat (हाडें नरम करण्याकरिता त्यांना) ओली आंच देण्याचे भांडे n. chem. सिक्तनयंत्र n. Diges'tibil'ity n. पचनीयता f. Diges'tible a. पचायाजोगा-जोगता, पचनीय. Diges'tion (Fr. digestion). पचविणे n, पचनशक्ति f, पाचन n. [BAD OR WEAK D. अग्निमांथ n.] २ वर्गीकरण n. ३ विचारपूर्वक मनन n. ४ पुवळणास.आणणे n, पिकवणे n. Diges'tive a. पाचक, अग्निवर्धक, दीपक, पचनक्रियेसंबंधी. [D. APPARATUS the organs of food-digestion, especially, the alimentary canal and glands Connected with it पचनोपकरण n- पचनक्रिया घडवून आणणारे पोटांतील अवयव m.pl. [D. POWERS जठराग्नि m, जठरानल m. LANGUOR OF D. POWERS अग्निमांथ n. Diges'tively adv. Digest ( di'-jest ) [L. digestum pl. digesta, digestus. See Digest. ] n. any compilation, abridgement or summary under proper heads or titles एखाद्या ग्रंथाचा विषयवार-वर्गीकृत संग्रह m, वर्गीकृतसंग्रह m. २ (law.) कायद्यांच्या संग्रहाचे पुस्तक n. ३ (spec. Roman Law.)प्राचीन रोमनलोकांतील वर्गीकृत केलेला कायद्याचा संग्रह m. Digit ( dijʻ-it) [L. digitus, a finger or toe, akin to Gr. daktulos. ] n. a finger or toe बोट n, पायांचा अंगठा m. a finger's breadth commonly three-fourths of an inch बोटाची रुंदी f, ही पाऊण इंच समजली जाते. ३ math. one of the first ten figures अंक m, आंकडा m, स्थानीय संख्या f. [संख्या मोजतांना