पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1081

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n (S. ), असाम्य (S. ), वैषम्य n. (S.), [D. GREAT AS BETWEEN BLACK AND WHITE आकाशपाताळाचा भेद m, कोळसा आणि माणीक (हिरा) वांमधील भेद m, राजहंस आणि कावळा यांमधील भेद m, उजेड आणि अंधार यांमधील भेद m, जमीन अस्मानाची तफावत f. SLIGHT DIFFERENCE (OF ONE THING WITH ANOTHER ) किंचित फेर m, हेरफेर m. SPLITTING THE D. ( IN BARGAINS ) फरक निम्मेनिम तोडून टाकणे, खांजणीमांजणी f, कवडतावड f, तोडजोड f. ] २ disagreement in opinion. मतभेद m, मतांतर n, वैमत्य n. ३ (a) quarrel, dissension, controversy वांकडे n, वाद m, द्वैतभाव m. (b) cause of dissension भांडणाचे कारण n, तंट्याचे मूळ n-विषय m, मतभेदाचे कारण n, विषय m. ४ mark of distinction, characteristic quality, specific attribute विशेष m, भेदकधर्म m. ५ (log.) differentia व्यावर्तकधर्म m, असाधारणधर्म m. ६ arith. remainder अंतर n, बाकी f, शेष m. ७ math. the increment produced. in a function of a variable by increasing the variable by unity तात्कालिक गति. [CALCULUS OF DIFFERENCES SAME AS DIFFERENTIAL CALCULUS.] Diff'ereney n. (Shakes.). Same as Diff'erence. Diff'ering pr. p. Diff'erent a. वेगळा, निराळा, न्यारा (vulg.), दुसरा, इतर, अन्य, भिन्न, अपर, पर, वायला ( vulg.), सवता (vulg. ). २ असदृश, विसदृश, विजातीय, विगुण (S), विलक्षण (S). Differen'tia m. logic. व्यावर्तक धर्म m, व्यावर्तन n, असाधारण धर्म m. Diff'erentine pl. Differen'tial a. भेदकारक, भेददर्शक, भेदविषयक, भेदासंबंधी, भेदावर अवलंबून राहणारा, भेदामुळे होणारा, भेदजनित. २ constituting a specific difference, distinguishing, special विशेष, असाधारण, व्यावर्तक, विशेषभेदमूलक. ३ relating to specific differences विशेषभेदासंबंधीं. ४ math. relating to infinitesimal differences तात्कालिकगतिसंबंधी, तात्कालिकगतिविषयक. ५ (physics and mechanics) (दोन निराळ्या गति किंवा दाब किंवा उष्णमाने यांमधील ) फरक दाखविणारा, ह्यांमधील फरकांविषयी अतिसूक्ष्मभेददर्शक. D. n. तात्कालिक गति f, तात्कालिकगतिदर्शक वृद्धि f- भेद m. Diff'eren'tially adv. Differen'tiate v. t. to make or render different वर्ग m. पाडणे, निराळा करणे,भेद m. काढणे, (भेदावरून वर्गीकरण m. करणे. २ to make unlike by modification for a special purpose or function विशिष्ट करणे, विशेषीकरण n. करणे, विशेषधर्माची वृद्धि f, करणे. ३ to discriminate between विशेषभेद m. काढणे, फरक ओळखणे. ४ math. to obtain the differential coefficient of तात्कालिकगतिगुणक काढणे. D. v. i. विशेषीकृत होणे. २ फरक ओळखणे. Diff'erentia'tion n. अंतर n- फरक m. काढणेंn, वर्ग पाडणें n, वर्गीकरण n. २ विशेषीकरण n. ३ log. व्यावर्तन n, विभेदन n, व्यावर्तकत्व n. ४ विशेषीकरण n. ५ math. तात्कालिक गति f. [ PARTIAL D. खण्ड तात्का-