पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1077

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

tation (एखाद्या विषयासंबंधानें ) पूर्ण माहितीचे आगरवर, पूर्णमाहितीचा कोश m; जसे, आमच्या म्युनिसीपालिटीच्या संबंधाने (क्ष) हा पूर्ण माहितीचा चालता बोलता कोशच आहे, x is a living D. of our Municipal affairs). Dictiona'rian (R.) कोशकार m. Dictum (dik'.tum) [L.] n. authoritative statement, dogmatic saying, apothegm वचन n; as in मनूचे वचन-वाक्य n, म्हणणे n, उक्तवाक्य n, नियम m, अधिकारी मनुष्याचे मत n, निकाल m. २ law. दाव्याशी संबंध नसलेल्या मुद्यावर न्यायाधिशांनी दिलेले मत n. pl. Dic'ta. Dictyogen (dik'ti-o-jen) n. bot. जाळ्यासारख्या शिरा ज्याच्या पानांत असतात असे झुडुप n, जालपर्णी झुडुप n. (Ex. म्हारचांफा). Did, Didst (did, didst ) pa. t. of Do. Didactic,-al (di-dak'-tik ) [Gr. didactikos, apt at teaching.) a. fitted or intended to teach, preceptive, instructive, teaching some moral lesson उपदेशपर, उपदेशात्मक, उपदेशाचा, बोधपर, ज्ञानदायक, नीतिपर. Didac'tically adv. उपदेशपररीतीनें. Didac'ticism n. उपदेशपरता, f नीतिपरता f. Didactics n. pl. the act or science of teaching नीतिशिक्षण n, शिक्षा f. Diddle ( did'-l) [A recent word of obscure origin. ] v. t. to waste time in the merest trifling क्षुल्लक गोष्टींत वेळ घालविणे. २ to cheat or swindle फसविणे, ठकविणे. To D. out of फसवून-हिरावून घेणे; as, "You were diddled out of fifty thousand pounds." Didd'ler n. फसव्या m, ठक m. Diddle (did'l) v.i. मुलासारखें तोल सांवरीत चालणे. Dido (di-do) n. फसविण्याची युक्ति f, खोडी f. [TO OUT A.D. खोडी करणे, फसविण्याची युक्ति काढणे.] Diduction (di-duk-shan) n. उपांगवियोग m, भाग निरनिराळे करणे n. Didynamia (did'-i-nā'-mi-a) [Gr. di, double & dunamis, strength.]n. bot. तुळस सबजा सारख्या पुष्पांतील दोन आखूड आणि दोन लांब असे पुंकेसर असलेल्या झाडांचा वर्ग m, तुलसीवर्ग m. Die ( di ) [M. E. dyen, deyen; Late A. S. degan, to die ] v. i. to pass from an animate to a lifeless state, to cease to live ( said of animals and vegetables often with of, by, with, from, and rarely for before the cause or occasion of death) मरणे, गुजरणे, मृत होणे, प्राण-जीव जाणे, पंचत्व पावणे, जाणे (fig.), निवर्तणे, वारणे, गत f. होणे, निजणे (euphemistically), नाश पावणे-होणे. [THE FOLLOWING WORDS & PHRASES ARE CANT, COVERT, ALLUSIVE, &C., BUT THEY ARE TOO COMMON TO BE OMITTED देवाशा होणे, निवर्तणे, परलोकवासी होणे, देवाकडे जाणे, गुंडाळणे, आटपणे, संपणे, खटारणे, खटावणे, धडधडणे, चंचरणें (R.), गवाळे n. आटोपणे, गाशा m. गुंडाळणे, डोळे झांकणे, बिऱ्हाड n. अटोपणे, पंथास पोहोंपणे, चसनापुरास जाणे, लष्कर कामास येणे