पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1076

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेरणा f, चोदना f. (S.), सांगी f, सांगणे n. Dicta'tion n. मजकूर लिहून घेण्याकरितां सांगणे n, शुद्धलेखनाकरितां मजकूर सांगणे n. २ सांगून लिहविलेला मंजकूर m. ३ शुद्धलेखन n. ४ authoritative utterance सत्तेने तोऱ्यानें-आढ्यतेने सांगणे-फरमावणे. Dicta'tor n. a ruler or governor whose word is law; an absolute ruler of a state (राज्यांतील) अप्रतिबंध सत्तायुक्त मनुष्य m, अप्रतिबंध सत्तेचा मनुष्य m. २ a chief magistrate invested with absolute authority elected in seasons of emergency by the Romans and by other Italian States. जुन्या रोमन लोकांनी व इटालीतील इतर संस्थानांनी आणीबाणीच्या वेळी शांतता करण्याकरितां निवडलेला अप्रतिबंधसत्तायुक्त मनुष्य m. ३ a person exercising absolute authority of any kind or in any sphere; one who authoritatively prescribes a course of action or dictates what is to be done (कोणत्याही बाबतीत ) अनियमितसत्ताधारी मनुष्य m, लोकांच्या वर्तनासंबंधी सत्तेने नियम घालून देणारा, कोणतेही काम अप्रतिबंधसत्तेने करणारा. ४ one who dictates to a writer शुद्धलेखन सांगणारा. Dicta'tress, Dictā’tric n. fem. Dictatoʻrial a, absolute, unlimited अप्रतिबंधमत्तायुक्त, स्वतंत्र, स्वेच्छ, अमर्गाद. २ imperious, overbearing अहंपणाचा, आढ्यतेचा. Dicta'torship, Dic'tature n. अनियंत्रित-अनिर्बधसत्ता f. Dicta'tory a. Diction ( dik'-shun) [ L. from, dicere, dictum, to day.] n. choice of words for the expression of ideas, language शब्दयोजना f, भाषापद्धति f, वाणी f, भाषा f. [GOOD D. मार्मिक शब्दयोजना f.] N. B. Phraseology विशेषशब्दयोजना; Diction शब्दयोजना; Style=भाषारीति, भाषापद्धति as: वैदभी, गौडी, &c. of Sanskrit writers. Dictionary ( dik'-shun-eri ) ( From med. L. dictionarium or dictionarius, lit, a repertory of dictions, phrases or word. Fr. dictionnaire; Ital. dizionario, Span. diccinario. Dictionary शब्दाचा मूळ अर्थ शब्दकोश असा आहे, परंतु सध्या अक्षरांच्या अनुक्रमणिकेप्रमाणे रचलेल्या कोणत्याही पूर्ण माहिती देणाऱ्या पुस्तकाला हा शब्द लावितात; जसें, Dictionary of architecture, of biography, of geography. इ. स. १२२५ साली जोन-द-गार्लीदिया नामक एका इंग्रजी गृहस्थाने आपल्या विद्यार्थ्यांच्या उपयोगाकरितां वाक्यरूपाने विषयवार लिहिलेल्या ल्याटीन शब्दसंग्रहाला Dictionarius हे नांव प्रथम दिले.] n. शब्दकोश m. [एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शब्दांचा अर्थ सांगणान्या कोशाला Bilingual Dictionary (द्विभाषिक कोश) असें म्हणतात. तीन भाषेच्या शब्दकोशाला Trilingual D. (त्रिभाषिक कोश ) असे म्हणतात. तीहीपेक्षा जास्ती भाषांच्या शब्दकोशाला Polygiot (विविधभाषिक कोश) असे म्हणतात.] २ (.fig.) a person or thing regarded as a repository of knowledge, convenient for consul-