पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1068

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

objects beyond the limits of experience i. e. the soul, the world, God अज्ञेयमीमांसा f, अज्ञेयवाद m, आत्मा, ईश्वर आणि जग ह्या अतींद्रिय पदार्थाचें बुद्धीने आकलन करीत असतानां उत्पन्न होणाऱ्या विरोधांचा विचार m. ८ (according to Hegel) who denies that such contradictions are ultimately irreconcilable the term is applied (a) to the process of thought by which contradictions are seen to merge themselves in a higher truth that comprehends them & (b) to the world-process, which being in his view but the thought-process or its objective side developes similarly by a continuous unification of opposites. (क्यांट प्रमाणे) परस्परविरोधी कल्पनांची एकवाक्यता किंवा संबद्धता दाखविण्याची पद्धति f, विरोधाभासनिरसन n. N. B.-Dialectic शब्दाचा मूळ अर्थ प्रश्नोत्तररूपानें वादविवाद करून सत्त्यासत्त्याचा निर्णय किंवा अनुमान किंवा तर्क करण्याची कला असा आहे. ही कला झेनो नांवाच्या ग्रीक तत्वज्ञाने प्रथम प्रचारांत आणिली व इचा साक्रेतिसाने अध्ययन व अध्यापन या दोन गोष्टींकरितां जन्मभर उपयोग केला. प्लेटोने या कलेला शास्त्रीय स्वरूप दिले. प्लेटोचे सर्व ग्रंथ या प्रश्नोत्तररूपी वादविवादपद्धतीने लिहिलेले आहेत. प्लेटोने Dialectic हा शब्द दोन अर्थी वापरिला आहे. निरनिराळ्या पदार्थाच्या जातींचा (ideas) यथार्थ बोध करून देणारी प्रश्नोत्तररूपी विचारपद्धति असा प्लेटोप्रमाणे D. चा एक अर्थ आहे व त्याने आपल्या Republic नामक पुस्तकांत जे ज्ञानाचे वर्गीकरण केले आहे, त्यांत Dialectic हा शब्द (१) पराविद्या, (२) ब्रह्मविद्या, (३) परमेष्ठिशान, (४) तत्वज्ञानाचा कळस (५) ज्या विद्यच्यायोगाने आपणांस इंद्रियगम्य विषयांपासून तो अतींद्रिय विषयांपर्यंत ज्ञान होते, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष ब्रह्म किंवा सच्चिदानंदाचें दर्शन होते अशी विद्या (६) "येन विदितेन सकलं विदितं भवति" या वचनांत सांगितल्याप्रमाणे जी विद्या आली असतां सर्व विश्वाचे ज्ञान होतें ती विद्या, अशा अर्थी योजिला आहे. प्लेटोच्या नंतर आरिस्टॉटल याने निश्चित किंवा सिद्ध अनुमानपद्धति ह्मणजे Demonstrative method of science व संभवात्मक किंवा सिद्धकल्प अनुमानपद्धति म्हणजे Probable method of reasoning असे दोन ज्ञानसिद्धीचे मार्ग कल्पिले आहेत व त्यांपैकी दुसऱ्या मार्गाला किंवा पद्धतीला Dialectic हा शब्द त्याने योजिला आहे. आरिस्टॉटलच्या मताप्रमाणे प्रश्नोत्तररूपी वादविवादाने मिळणारे ज्ञान पक्के किंवा सिद्ध किंवा निश्चित असे नसते म्हणून त्यास त्याने Dialectic किंवा Probable reasoning किंवा सिद्धकल्प किंवा संभवात्मक अनुमानपद्धति असे म्हटले आहे. स्टोइक पंथाच्या लोकांनी अलंकारयुक्त वक्तृत्वशास्त्र व तर्कशास्त्र असें ग्रीक न्यायशालाचे दोन भाग केलेले होते. परंतु स्टोइककालानंतर बरीच शतकें मध्ययुगीन कालापर्यंत Dialectic हा शब्द न्यायशास्त्राकरितांच वापरीत असल्यामुळे इंग्रजी भाषेत चारपांचशे वर्षांपूर्वी D. हा शब्द Logic किंवा न्यायशास्त्र या अर्थीच वापरीत असत. क्यान्ट या जर्मन तत्वज्ञाने D. हा शब्द अज्ञेय मीमांसा या अर्थी योजिला आहे. त्याने आपल्या ज्ञानमीमांसा (Critique of Pure Reason) या नांवाच्या ग्रंथांत तिसऱ्या भागाला Dialectic हे नांव दिले आहे. या तिसऱ्या भागांत मानवी बुद्धीला बुद्धिसापेक्षच ज्ञान होते. केवल