पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1067

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n, छायायंत्र n. (R.), सूर्यघटी f. (obs.). २ the graduated face of a time-piece or a clock घड्याळाची तबकडी f. ३ (आंकडे घातलेली) तबकडी f. ४ miner's compass for underground surveying खाणीत काम करणाऱ्याचे मोजणीचें यंत्र n. [THE MARINER'S BUN. DIAL IS ENSENTIALLY THE SAME AS THE CIRCUMFEBENTOR USED BY THE LANDSURVEYOR.). D. v. t. छायायंत्राने मोजणे. Di'alist. n. a maker of dials छायायंत्र करणारा, &c. २ छायायंत्रवेत्ता, &c. Di'alling n. छायायंत्रज्ञान n, छायाविद्या f. Dial-plate n. छायावृत्त n. २ घड्याळाची तबकडी f. Style of a dial छायासूची f. Dialect (di-a-lekt ) [ Fr. dialecte-L. dialectus-Gr. dialektos, discourse, language, dialect.] n. the form of speech of a limited region or people, a variety or sub division of a language प्रांतिक भाषा f, पाेटभाषा f, देशभाषा f, (विशेष प्रांताची) बोली f, विशेषवर्गाची भाषा f, भाषाप्रकार m. २ language, tongue; form of speech बोली f, भाषा f. Di'alectal a. पाेटभाषेसंबंधी, बोलीसंबंधीं. Dialec'tism n. पोटभाषेचा शब्दसंप्रदाय m, पोटभाषेपणा m. Dialectol'ogist n. पाेटभाषेत प्रवीण असलेला मनुष्य m, पोटभाषाभिज्ञ m. Dialetol'ogy n. पोटभाषांचा शास्त्रीय विचार m, पोटभाषाशास्त्र n. Di'lectici'an n. Dialectic ( di'a-lek’-tik ) [O. Fr. dialectique-L. dialectica -Gr. dialektike, the dialectic art, the art of discussion or debate. ल्याटिन भाषेत Dialectical हे नपुंसकलिंगी अनेक वचन असल्यामुळे इंग्रजीत Dialectic असा बरेच वेळां अनेकवचनीही प्रयोग आढळतो.] n. (according to Socratis ) प्रश्नोत्तराने वादविवाद करून पदार्थाच्या जातीचे (ideas) यथार्थज्ञान मिळविण्याची पद्धती f. २ (according to Plato) (a) निरनिराळ्या जातीच्या पदार्थाचा यथार्थ बोध करून देणारी प्रश्नोतररूपी वादविवादपद्धति f. (b) पराविद्या f, ब्रम्हविद्या f, ब्रम्हज्ञान n, तत्वज्ञानाचा कळस (?) m, परमेष्टीज्ञान n. ३ (according to Aristotle) प्रश्नोत्तररूपाने निश्चितकरूप किंवा सिद्धकल्प किंवा संभवात्मक किंवा probable ज्ञान मिळविण्याची पद्धति f. ४ ( with the stoics and down to the Middle Ages) -न्यायशास्र n. तर्कशास्त्र n . ५ वादविवादकला f. हा तर्कशास्त्रात किंवा न्यायशास्त्रांत तर्कांच्या किंवा अनुमानांच्या पद्धती व ती बिनचुक काढण्याचे नियम सांगितलेले असतात. ६ ( modern English) the art of critical examination into the truth of an "Specifically applied to the criticism which shows the mutually contradictory character of the principles of science, when they are employed to determine