पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1064

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्व, १२ भाग पाणी, आणि एक भाग गंधकाम्ल, ही एकत्र करून कढवावी हाणजे त्या सत्वाचा हळूहळू सिंद्रक बनतो, तो काही तास पर्यंत कढल्याने त्याची द्राक्षशर्करा बनते. ह्या द्रवांतील आम्ल न्यूटलाईज ( अव्यापारक, निष्क्रिय ) करण्यासाठी त्यांत खडूचे चूर्ण घालावें ह्मणजे सल्फेट आफ् लाईमचा सांका बनतो. त्यापासून तो द्रव गाळून वेगळा काढावा. मग त्यांत प्राणिज कोळसा शुद्धीकरणार्थ घालून कढवून आटवावा; आणि पुनः गाळून स्फटिकीकरणास ठेवावा. त्यांत जे स्फटिक बनतात ते द्राक्षशर्करेचे होत. Dextrose ( deks'-tro-j) [L. dexter, right.] n. grape sugar द्राक्षशर्करा f. Dextroversion ( dex'-tro-ver-shun ) n. उजवे बाजूकडे वळविलेले असणे n. [ D. OF THE UTERUS गर्भाशयाचे बूड उजवेबाजूस वळलेले असणे-वळणे,दक्षिणनमन n, गर्भाशय-सव्येतरनमन n.] Dhobie (dho-bi) [ Hind. ] n. परीट m, धोबी m. Diabetes (di-a-be-téz) [Gk. diabutus,-L. diabetes, a pair of compasses, a siphon, diabetes Gr. diabainein, to stand with the legs apart Gr. dia, apart & baincin, to go.] n. a disease which is attended with a persistent, excessive discharge of urine मधुमेह m, इक्षुमेह m. या रोगांत शरीरांतील सर्व साखर लध्वींतून जाते, त्यामुळे लघ्वीचे प्रमाण वाढते व ती गोड होते. Same as Diabetes Mellitus. Diabetes Insipidus बहुमूत्र, बहुमूत्रमेह m, उदकमेह m, मूत्रातिसार m. मूतसागर m. ह्या रोगांत फक्त लघ्वीचे प्रमाण वाढते, परंतु तींतून साखर जात नाही. यास सोमरोग असेही म्हणतात. Di'abet'ic, al. a. मधुमेहासंबंधी. २ मधुमेह असलेला, मधुमेहाचा (रोगी). Diablerie, Diablery (di-ab'-ler-i) [F. diablerie-Fr. diable, devil-L. diabolus, devil. ] n. business connected with the devil, or in which the devil is employed or has a hand, wild, recklessness, devilry सैतानी कृत्य n, अत्यंत दुष्ट कृत्य n, (सैतानास शोभणारें) भयंकर कृत्य n. २ sorcery or conjuring in which the devil is supposed to assist चेटूक n, जादूटोणा m. 3 that part of mythology which has to do with the devil or devils; devil-lore पिशाच्च-विद्या f, पुराणांतील पिशाच्चवर्णनाचा भाग m. ४ the realm, world or assemblage of devils पिशाच्चाचे राज्य n. Diabolic,-al (di-a-bol'-ik,-al) [ Gr. diabolos, the devil. ] a. pertaining to the devil सैतानाचा. २ resembling or appropriate to the devil सैतानास शोभणारा . 3 pertaining to witchcraft or magic as attributed to satanic influence जादूविद्येसंबंधी, चेटकविद्येसंबंधी, जारणमारणउच्चाटनासंबंधीं. ४ atrocious, outrageously wicked, inhumanly wicked दुष्ट, वाईट, घोरपापाचा, अतिदुष्ट, अपवित्र, सैतानी, राक्षसी, अघोरी, अंगावर शहारे आणण्याजोगा, दारुण. Di'abol'ically adv. Di'abolize v. t. ( R.) दुष्ट करणे, सैतानी-अघोर स्वरूप देणे. Diab'olism n. अतिदुष्ट