पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1059

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा आहे. Blue-devil See under Blue. Cartesian Devil पदार्थाचे विशिष्टगुरुत्व दाखविणारी कांचेची बाहुली f. 'Tasmanian Devil एक तऱ्हेचा नांसभक्षक व आपलें पोर सतत आपल्या आंगावर बाळगणारा प्राणी m. to play the devil with रसातळास पोहोचविणे, सत्वानास करणे. Printer's Devil छापखान्यांतील कामशिकाऊ पोऱ्या m. हा शाईचे रूळ धुणे, झाडलोट करणे, वगरे हलकी कामें करतो. ह्याच्या आंगांत फाटके तुटके कपडे असतात व त्यांना शाई व इतर घाण लागून ते मळकट झालेले असतात. म्हणून त्याला Devil असे म्हणतात. Between the devil and the deep sea एकीकडे आड व एकीकडे विहीर अशा स्थितीत, पेंचांत. As the Devil loves holy water (भूताला जसे तीर्थ आवडते तसें म्हणजे) अगदी न, मुळीच नाही. Devil rides on a fiddle stick क्षुल्लक गोष्टीस अतिशय महत्व देणे. Cheating the devil भुतास ठकविणे, प्रातज्ञेतून युक्तीने निसटून जाणे, आपले वचन पाळून दुसऱ्यास फसविणे. Give the devil his due अतिशय दुष्ट मनुष्याच्या देखील गुणांचे चीज केलेच पाहिजे. Gone to the devil रसातळास-भयाअंगास पोंचला आहे. ची वाताहात झाली आहे. Devil's bones फांसे (खेळण्याचे). हे हाडाचे केलेले असतात व त्यांपासून (जुगाराने) खेळणाराचा नाश होतो म्हणून त्यास हे नांव पडले आहे. Devil's current बास्फरस समुद्राच्या एका प्रवाहाला त्याच्या अत्यंत वेगामुळे हे नांव पडले आहे. Devil's daughter's portion डील, डोव्हर व हारिच या बदरांत नवख्या खलाश्यांना व प्रवाश्यांना नागवीत यामुळे त्यांतील बंदरास सैतानाच्या मुलीचे आंदण गाव असें ह्मणण्याची रूढि पडली होती. Devil's luck n. विलक्षण सद्दी. अशा सद्दीच्या लोकांना भूत सहाय्य आहे असें जुन्या काळचे लोक मानित. Devil's mass वारंवार शपथा घेणे. To say the devil's pater-noster देवास दोष देणे-बोल लावणे. Talk of the devil & he is sure to come नांव काढल्याबरोबर दत्त म्हणून उभा, एकदम दत्त म्हणून उभा. To hold a candle the devil भयामळे दुष्टास देखील साहाय करणे. To kindle a fire to the devil पुण्याच्या भ्रमाने पापाचरण करणे. When the devil is blind कधीही न. Devise (de-viz' ) [ Fr. deviser, to distribute, to regulate -L. dividere ( divisum), to divide. Devise formerly included the notion of to construe, to frame, to fashion, now it expresses only the mental process of inventing or contriving. ] v. t. to formulate by thought, to contrive, to invent, to plan ,to scheme कल्पिणे, योजना f- रचना f. करणे, नविन शोध m. लावणे: as, To D. an engine. २ to plan or scheme for, to purpose to obtain (संपादनार्थ) युक्ति f- बेत m. योजणे, प्रयत्न m-खटपट f. करणे. ३. law. to give by will (स्थावर जिंदगी) मृत्युपत्राने देणे, पूर्वी हा शब्द जंगम मिळकतीलाही लावीत असत. D. v. i. to form a scheme, to lay a plan, to con