पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1044

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आसमोड f, आशानष्टता f, हिरमोड m.that which is despaired of जिच्याविषयी निराशा झाली आहे अशी वस्तु f, निराशाविषय m. Despair'er a. आशा सोडणारा. Despaired' a. निराश, नष्टाश, गताश, भग्नाश, हताश. Despair'ing a. feeling or expressing despair, hopeless निराश, हताश. Despair'ingly adv. निराशेनें. Despatch ( de-spach') Dispatch (dis-pach') [ Span. despachar, to despatch, to expedite-L. dis, away & L. type pactare, to fasten.) v. t. to dispose of speedily (as business), to execute quickly, to finish, to perform उडवणे, झपाझप निकालांत आणणे, (कामाचा) बार m. उडविणे, उरकणे, आटपणे, संपवणे, फडशा पाडणे, (काम) करून टाकणे, उलगडा करून टाकणे. २ (obs.) to rid, to free सुटे-मोकळे-मुक्त करणे,(ला) स्वतंत्रता देणे. ३ to get rid of by sending off, to send away hastily पाठवून मोकळे होणे, रवानगी करून टाकणे, ब्याद घालविणे, उचलबांगडी करून टाकणे. ४ to send of or away (as messengers, messages, letters, &c.) दवडणे, दामटणें, दपटणे, पिटणे, पिटाळणे, पिटाळून-पळत लावणे, धावडणे, रवानगी करणे, हकारणे, पाठविणे, धाडणे. ५ to send out of the world, to put to death ठार मारणे-करणे, (ची) गति-गत-लावणे-देणे, इहलोकांतून पार करणे, 'फडशा पाडणे, निकाल करणे. D. v. i. to make haste घाई-गर्दी करणे. २ to conclude an affair, to finish a matter of business काम पुरें करणें-आटोपणे संपवणे पार करणे, कामाचा निकाल करणे. D. n. the act of sending a message or messenger निरोप धाडणे, जासूद दवडणे n. २ any sending away, dismissal, .riddance बोळवण f, उचलबांगडी f, सोडवणूक f, सुटका f, मुक्ति f. ३ the finishing up of a business, speedy performance, prompt execution, diligence, haste (कामाचा) निकाल m, उरक m, आटप m, झपाटा m, झटपट.f, चलाखी f, जलदी f, घाई f, त्वरा f, उताबळ f. ४ ( a.) a message despatched or sent with speed त्वरेने पाठविलेला निरोप m- संदेश m. (b.) pl. important official letters sent from one public officer to another खलिते, सरकारी टपाल-कागद-लखोटे. ५ ( modern ) a message transmitted by telegraph तारेने पाठविलेली बातमी f- निरोप m- तार f. Despatched' a. Despatch-boat n. जरूरीचे खलिते नेण्याकरितां ठेवलेली जलद चालणारी बोट f. Despatchbox n. सरकारी कामाचे कागदपत्र नेण्याची थैली f. २ प्रवासीपेटी, हीत लेखनाचे वगैरे सामान असते. Despatch'er n. पाठविणारा. Despatch'ful adv. (Milton ) घाईचा, जलदीचा. Pneumatic despatch n. हवेच्या दाबाने पत्रे, तारा किंवा लहान बंग्या खालून वर किंवा वरून खाली पाठविण्याची व्यवस्था f. Desperado (des'-per-ā'-do) [ M. Span. desperado--L. desperatus, pa. p. of desperare. ] n. a reckless, furious man; a wild ruffian ऋूरकर्मा m, रामोशी m,