पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1042

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

an object of longing इच्छाविषय n, इष्टवस्तुं f, इष्टपदार्थ m, लोभविषय m. ४ excessive longing, last अतिलोभ m, तृष्णा f, लालसा f, उत्कठा f, आकांक्षा f. Desi'rable a. इच्छिण्याजोगा-सारखा, कास्य, कामनीय, स्पृहणीय, स्पृह्य, अपेक्षणीय, अक्ष्य, अपेक्षितव्य, आकांक्षनीय, वांच्छनीय, इच्छाई, कामार्ह, लोभ्य, लाेभनीय. Desi'rableness n, Desi'rabil'ity n. इष्टता f, स्पृहणीयता f, इच्छार्हता f , लोभनीयता f. Desirably adv. Desired' a. इच्छिलेला, इच्छित, अपेक्षित, आकांक्षा, आकांक्षित, कांक्षित, वांछित, इष्ट, अभीष्ट, अभिलाषित. Desire'less a. निरिच्छ. Desi'rer n. Desi'ring pr. a. Desi'rous a. इच्छिणारा, इच्छावान, साकांक्ष, इच्छु (esp. in comp., as, धनेच्छ, विद्येच्छु, जगद्धितेच्छु, मोक्षेच्छु), आकांक्षी ( in comp. ), हव्यासी, लुब्ध (in high degree), craving हवळा, उत्कंठित, सोत्कंठ, अभिलापी, भुकेला, लोभग्रस्त, लोभाविष्ट, लोलुप, लोभाक्रांत, लोभातुर, लोभाकुल, लोभांध, अतीच्छ, आशाळभूत. Desi'rously adv. आतुरपणाने, उत्कंठितपणाने. Desi'rousness n. मिळविण्याची उत्सुकता f. N. B. Note the uses: Desiring to do a thing, Desirous of doing a thing. Desist ( de-sist') [ O. Fr. desister, to cease-L. desistere, to desist -L, de, away & sistere, to stand still, from stare, to stand. ] v. t. to cease to act, to stop, to forbear (often with from ) बंद पडणे, (पासून) थांबणे, राहणे, हात आटोपणे काढणे, सोडून देणे. Desist'ance'-ence n, Desist'ing n. राहणे n, हात आटोपणे n. Desist'ive a. (R.) final, conclusion शेवटचा, अखेरचा. Desk (desk ) [ M. E. deske, desk -Mod. L. desca, desk -L. discum, acc. of discus, & disk.] n. a sloping table for the use of writing (लिहण्याच्या सोईचे) उतरतें मेज n, लिहिण्याचे टेबल n. २ a shut-up writing-box लिहिण्याकरितां उतरतें मेज करिता येणारी कागद वगैरे ठेवण्याची पेटी f. ३ (in a church or chapel) गायकमंडल बसण्याचे किंवा प्रार्थनापुस्तक ठेवण्याचे मेज n. ४ fig. ख्रिस्ती उपाध्याnयाचा धंदा m- हवा m- काम . ५ fig. ख्रिस्ती देवळातील गायकमंडळ n. Desk-work n. कारकुनीकाम n, लेखनकाम n. D. V. t. मेजांत बंद करून ठेवणे. २ to treasure साठवून ठेवणे. N. B.-Desk हे निरनिराळ्या आकाराचे व रचनाचे असते. त्याचे litany-desk, music-desk, prayer-desk, reading-desk, school-desk आणि writing-desk असे निरनिराळे प्रकार आहेत. Desman (des'man) n. एका जातीची चिखुदरी f. Desmoid (des'-moid) [ Gr. desmos, ligament + oid.] a. resembling or having the characteristics of a ligament संधिबंधनासारखा, संधिबंधासारखा, संधिबंधसदृश्य.