पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1040

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

designate, to show, to appoint अंगुलिनिर्देश करणे, (निर्देश करून) ठरविणे, नेमणे. ३ to form an ideas of, to project मनांत बेत योजणे-रचणे, मनांत घाट घालणे, मनांत रचना करणे, कल्पिणे. ४ to intend, to purpose (usually with for before the remote object but sometimes with to) उद्देशणे, संकल्प करणे, बेत-विचार ठरविणे. D. v. i. to form a design नकाशा काढणे. २ to plan बेत ठरविणे. D. n. a preliminary sketch or plan नकाशा m, नमुना m, कल्पनाचित्र m, रेखाटणी f. २ scheme, plan, project कल्पना f, रचना f, बेत m, योजना f, युक्ती f. ३ (in bad sense ) evil intention, or purpose, scheme, plot दुष्ट मसलत f-बेत m, कृष्णकारस्थान n. ४ intention or purpose as revealed or inferred from the adaptation of means to end उद्देश m, हेतु m (spec.) ईश्वरी योजना-हेतु m. ५ the realisation of an inventive or decorative plan कल्पनेवरून केलेले नकसकाम-खोद-काम n चित्र n-, हुन्नर f. Designa'ble a. distinguishable (नकाशाने) दाखविता येण्याजोगा, ओळखितां येण्याजोगा. Des'ignate v. t. to mark out, to make known, to indicate, to name निर्देशणे, निर्देश करणे, अमुक म्हणून सांगणे, नांव देणे, नामनिर्देश करणे. २ to call by a distinctive title or to name पदवी-नांव-हुद्दा-किताब देणे. ३ to indicate, or set apart for a purpose or duty (with to or for) पदवी देऊन नेमणे- योजणे, नेमणूक f- योजना f. करणे. g.of o., नियुक्त करणे, आंखून देणे. Des'igna'ted a निर्देशलेला, नामनिर्दिष्ट, उपलक्षित, विशेषित. Des'igna'tion. n. the act of designating, indication निर्देश m. २ appointment for a purpose नेमणूक f, योजना f, आंखून देणे n. ३ distinguishing mark or title चिन्ह n, पदवी f, किताब m, नामाभिधान n, नांव n. ४ use, application, import अर्थ m, उपयोग m, प्रयोग m. [D. OF A WORD शब्दाचा अर्थ, भावार्थ m.] ५ law. नांव, धंदा, रहाण्याचे ठिकाण इत्यादिकांचा उल्लेख m. ६ वर्गनिर्देश m. Designa'tor n. नामनिर्देश करणारा m. २ (Roman Antiq.) (सार्वजनिक समारंभामध्ये प्रत्येकाला आपल्या) पदवीप्रमाणे जागा दाखविणारा कामगार m. Designed' pa. t & pa. p. a. Designed'ly adv. जाणून, आणून पुसून, समजून उमजून, मुद्दाम, बुद्धथा, बुद्धिपुरस्सर, उदमेखून (colloq.) Design'er n. a Contriver योजणारा. २ a plotter, a schemer योजक, कल्पक. ३ उपव्यापी, पाताळयंत्री. ३ स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याने कल्पकबुद्धीने चित्रे, कोरीव काम, नक्षी, रंग देणे इ. करणारा. Design'ful a. युक्तीपूर्ण, हुन्नरी. Design'ing a योजक. २ cunning लुच्या, उपव्यापी, बंधनशील, प्रतारक. N. B... मनसुबा f, उद्देश m, मतलब m, इंगित n, मानस & n, आशय m, निमित्त n, अभिप्राय m, अभिप्रेत n, हृदय. हार्द्र (pop.) (हरद्र or हरिद्र or हार्द्र) n, संकल्प m, विवक्षा f, चिकीर्षा f, विषय m, मनीषा f.