पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1037

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जांना मिळण्याजोगा; as, "A D. estate." Descen'dibil'ity n. वंशजांना मिळण्याची शक्यता. f. Descen'ding a. उतरता, उतरवट.[D. CONSTELLATIONS OR SIGNS (astron.) ज्यांतून ग्रह दक्षिणेकडे सरतात-जातात ते तारका पुंज. D. NODE (astron.) दक्षिणेकडे जाताना ग्रहाची कक्षा ज्या ठिकाणी क्रांतिवृत्तास छेदिते तो बिंदु m. D. REDUCTION उतरती मांजणी f. D. SERIES math. उतरती संख्या , श्रेढी, &c.] Descen'sion m. उतरणें n. descent उतार m. ३ degradation नम्रता f, हीनावस्था f. Descen'sional a. Descen'sive a. खाली पाडणारा. Descent' n. the act of descending उतरणे n, उतार m, अवरोह m, अवरोहण n, अधोगति f, अवतरण n, अवतार m, अवपतन n, अवपात m, अधःपात m. [D. FROM TIME IMMEMORIAL अनादिपरंपरा.] २ incursion, sudden attack: हल्ला m, चढ f. ३ progress downward उतरती कळा f, निकृष्ट आचरण n, अधोगति f, पतन n, नीचता f, आचारच्युति f. ४ lineage, birth, extraction वंश m, कुळी f, गोत्रोत्पत्ति f, उत्पाति f, वंशपरंपरा f. ५ (a) transmission of an estate by inheritance वारसहक्काने जिंदगी मिळणे. (B) title to inherit an estate by reason of consanguinity सगोत्रतेने येणारा वारसहक्क m. ६ declivity, slope उतरण f, उत्तरडे f, उतरडी f, उत्तार m, वरंगळ f, घसरण f. ७ descendants, issue वंशज m, वंश m, संतति f, संतान n. ८ (B.) the lowest Place, the bottom सर्वाच्या खालची जागा f, तळ m. ९ a generation पुढची पिढी f. १० mus. उंचस्वरापासून नीच स्वरांत जाणे n. Describe (de-skrib') [ L. de; down & scribere; scriotum, to write. ] v. t. to represent by drawing, to trace or marks out काढणे, रेखाटणे, नकाशा m. काढणे as, "So D. a circle." २ to represent by word (written or spoken), to give an account of (लेखांनी किंवा भाषणांनी) वर्णन करणे, निरूपिणे, निर्वचणे, वर्णन n, निरूपण n. करणे g. of o. ३ to make known to others by words or signs खुणेने दर्शविणे, लिहून-तोंडी दर्शविणे, शब्दानी कळविणे. ४ ( obs. ) to "distribute into parts, to class वर्गीकरण करणे. D. v.i. to use the faculty of describing, to give a description of वर्णनशक्तीचा उपयोग करणे, (चें) वर्णन करणे. Descri'bable a. अंकाया जोगा (R), रेखाटायाजोगा. ३ वर्णन करायाजोगता-सारखा, निरूपणीय, निरूप्य, निर्वचनीय, निरूपणयोग्य, निरूपणशक्य. Described' a. काढलेला, रेखटलेला. २ वर्णन केलेला-झालेला, वर्णित, जातवर्णन. Descri'ber n. वर्णन करणारा. Descrip'tion (deskrip'-shun ) n. the act of describing वर्णन करणे n, रेखाटणे n, वर्णणे n, निरूपणें n. २ an account वर्णन n, निरूपण n, निर्देश m, निर्वचन n, लक्षण n, व्याख्या f. ३ , delineation by marks नकाशा m. a kind, sort जाति f, जात f, प्रकार m, तऱ्हा f; as, "A person of this D." [Of what D. कसा.) Des