पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1033

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Depute ( de-pūt') [ Fr. deputer-L. deputare, to esteem, to consider-L. de & putare, to prune, to clean, to set in order.] v. t. to appoint or send as a substitute, to delegate नेमून-नियुक्त करून-वकील करूनअखत्यारी देऊन पाठविणे, वारचा-वांटचा पाठविणे, (आपल्या तर्फे) बदली कार्यकारी प्रतिनिधि नेमणे. २ (R.) to appoint, to choose नेमणे, (ची) नेमणूक करणे, निवडणे. D. a. (Scot.) प्रेषित, प्रतिनिधि. Deputa'tion n. the act of deputing नियुक्तप्रेषण n, प्रतिनिधिप्रेषण n, नेमून पाठविणें n. २ the person deputed प्रतिनिधि m, नियुक्त-प्रोपित मनुष्य m, मुखत्यार m, वकील m. ३ delegation प्रतिनिधिपणा m, मुखत्यारी f. Dep’utise v. t. to appoint as deputy वकील-प्रतिनिधि नेमण. D. v.i. to act as a deputy प्रतिनिधि-वकिलाप्रमाणे वागणेचें काम करणे. Dep'uty n. वकील m, प्रतिनिधि m, मुनीम m, मुतालीक m, दुय्यम m. २ कारभारी m. Dep'utyship n. वकिली f, वकिलायत f, मुनिमी f, प्रतिनिधित्व n. Chamber of deputies फ्रान्सांतील कायदे कौन्सिलाच्या दोन शाखांपैकी एक. हीतील सभासद लोकनियुक्त असतात. Deputy is used in combination with various executive officers to denote an assistant empowered to act in their name; as, D. collector, D. marshal, D. sheriff. (Web. ) Derail (de-ral' ) V.t. (आगगाडी) रुळांवरून घसरविणे-खाली आणणे. Derail'ment n. Derange (de-ranj) [L. dis, asunder & O. Fr. rangier, to rank.) v. t. to disturb the proper arrangement of, to disorder अ-गैर-व्यवस्था करणे, गोंधळणे, गफलतणे, धांदल f, घालमेल f गोंधळ m. करणे, क्रमभंग m. करणे. २ to disturb in the normal action of the intellect, to render insane बुद्धिभ्रंश-बुद्धिविक्षेप-चित्तविक्षेप-चित्तविभ्रंश-चित्तभ्रम करणे, भ्रमिष्ट करणे. ३ to disturb in the action or function of a machine or organism बिघडविणे, नादुरुस्त करणे. Deranged' a. गोंधळलेला, अव्यवस्थित. २ भ्रमिष्ट, विक्षिप्तबुद्धि, पिसा, वेडा. Derange'ment n. गोंधळणे n, घालमेल f, अव्यवस्था f, गोंधळ m, घोंटाळा m, गफलत f, भानगड f, गडबड f, उलटापालट f. २ बुद्धिभ्रंश m, चित्तभ्रम m, चित्तविभ्रंश m, चित्तविक्षेप m. Derby (dar 'bi) n. लंडनाजवळील एप्सम मैदानावर तीन वर्षीच्या उमरीच्या घोड्यांची प्रतिवर्षी होणारी शर्यत f. ही शर्यत १२ वा अर्ल ऑफ डार्बी याने इ. सन १७८० त सुरू केली म्हणून तिला डार्बी किंवा डर्बी असे म्हणतात. ही दरसाल म्हिटसन टाईडच्या आदल्या आठवड्यांतील बुधवारी होते. २ डार्बी नांवाची घुमटाकार टोपी f. [ DERBY DAY डर्बी येथील वार्षिक शर्यतीचा दिवस m.] Derbyshire-neck n. goitre or bronchocele गळ्याचे मधोमध एक गांठ सुजून ती मोठी होणे n. Derelict ( der'-e-likt) [ L. derelictus, pa. p. of derelinquere, to forsake-L. de & linquere, to leave ]