पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1032

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(of trade, &c.) मंदी f,मंद करणें n. ७ (med.) दबलेली स्थिति f, भिन्नता f, ८ (surg.) डोळ्यांतील मोतिबिंदू दाबून काढण्याची किया f. ९ (astron.) क्षितिजाखाली राहिलेल्या स्वस्थ पदार्थाचा उन्नतांश m. [ D. OF THE POLE ध्रुवापासून विषुववृत्ताकडे जात असतां क्षितिजाकडे ध्रुव खाली जात आहे असें दिसणे.] Depress'ive a. दबविणारा, अपमनामल, उदासीनता आणणारा, नमविणारा, नम्र. Depres'sor n. खाली दाबणारा m, जुलमी m. ३ med. खाली ओढणारा, अवनामक स्नायु m. Deprive (de-priv') [O. Fr. L. L. depriver, deprivars, deprivatum, to divest of office; L. de + privare, to bereave, to deprive of.] v. t. (abs.) to take away, to destroy नेणे, काढून नेणे, अंत-नाश करणे. २ to dispossess हिरावून काढून घेणे, बुचाडणे, नागवणे. ३ to divest of office (eccl.) धर्माधिकाऱ्याचा अधिकार काढून घेणे, \ अधिकारहीन-रहित करणे. Dep'riva'tion n. काढून टाकणे n, नागवणे n, नागवणूक f, नागवण f. २ नाश m, तोटा m, नुकसान n.३ हानि f. ४ पुरोहिताची वृत्ति काढून घेणे n. ५ प्रतिष्ठा-मान हिरावून घेणे n. [D. A BENEFICIO वेतनहरण n. D. AB OFFICIO अधिकारहरण n.] Depriv'ative a. Deprived' a. नागवलेला, नष्ट (in comp., as. नष्टबुद्धि, नष्टधैर्य.) [D. OF WEALTH गतद्रव्य. D. OF AUTHORITY अधिकारभ्रष्ट, पदभ्रष्ट.] Deprive'ment n. ( R.) नागवणूक f. २ नुकसान n. ३ पदभ्रष्टता f. Depth (depth) [See Deep.] n. खोली f, खोल जागा f. [D. UP TO THE BREAST छातीभर f, छाती ठाव m. D. UP TO THE WAIST कमरठाव m, कमरभर. D. ABOVE THE NECK बुडत ठाव m, गळाभर.] २ profoundness, intensity, abundance संपूर्णता f, गहनता f, गांभीर्य n, दार्ढ्य n, घनता f, सांद्रता f, आधिक्य n, वैपुल्य n, विपुलता f. ३ lowness गंभीरता f; as, D. of sound. ४ मध्यभाग m, मध्य m, also expressed by भर, ऐन: as, IN D. OF WINTER भर-ऐन हिवाळ्यांत. ५ logic. मिश्रकल्पनेची व्याप्ति f. ६ समुद्र m. [ D. OF FOCUS नाभीची खोली f. D. OF IMPRESSION संस्काराचें घनत्व n, -उठाव m. D. OF SOUND नीच स्वर m; स्वरगांभीर्य n. D. OF CUT जखमेची खोली f.] Depth'en v. t. (obs.) खोल करणे. Depth'less a. उथळ. २ अगाध, अमाप. Out of one's depth पाण्यांत जेथे एखाद्यास मुळीच तळ लागत नाही किंवा जेथे एखाद्याचा मुळीं बचाव होत नाही अशी (जागा), मनाच्या मगदूरीच्या बाहेरचा पलीकडचा. Depulse (de-pul's) [ L. depulsus. ] v.t. (obs.) to drive away हाकून देणे. Depul'sion n. हाकलून देणे n. (R.) Depurate ( dep'-u-rât ) [ L. de & purare, to purify. ] V. t. to free from impurities, to purify स्वच्छ करणे, साफ करणे, स्वच्छ-निर्मळ-शुद्ध-मळरहित करणे. D. a. cleansed साफ, स्वच्छ, निर्मळ. Dep'ura'tion n. शद्धिकरण n, शोधन n, (जखम) धुण्याची क्रिया f. Depura'tor n. शुद्धि करणारा (पदार्थ-द्रव्यं n.) Depura'tory a. (रक्त) शुद्धि करणारा, स्वच्छ करणारा.