पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1025

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

D. this new work." Denunciā'tion n. (obs.) proclamation, announcement जाहिरात f. २ the act of denouncing, public menace or accusation सार्वजनिक धाक-दहशत-आरोप m, नामोशी f, छीथू f , बदनामी f. 3 that by which anything is denounced, threat of evil, arraignment दहशत f, आरोप m, Denun'ciative, Denun'ciator'y a. (छीथू करण्याच्या हेतून) जाहीर करणारा, धमकी दाखविणारा, दोषारोप-तोहोमत आणणारा, भय घालणारा. Denun'cia'tor n. छिथूकरण्याच्या हेतूने जाहीर करणारा, &c. Deny (de-ni') [M. E. denien-M. Fr. denier-L. denegare, to deny fully-L. de, fully & negare, to deny. ] v. t. to contradict खरे नव्हे असें ह्मणणे, विरुद्ध बोलणे, (एखाद्या गोष्टीची सत्यता) नाकबूल करणे. २ (obs.) to refuse to do something (एखादी गोष्ट करण्याचे) नाकारणे, (करावयाचे) नाकबूल-अमान्य करणे; as, "If you deny to dance.” ३ to refuse to grant (मागणी) नामंजूर करणे, (केलेली विनंति, याचना इ०) अमान्य करणे, नन्नाचा पाढा वाचणें ; as, To deny a request; (ईश्वराने) न देणे; as, "The pleasure of seeing was denied to him." ४ to disclaim connection with आंगाबाहेर टाकणे, कान झाडणे, कानावर हात ठेवणे. [ TO DENY ONE'S WORD OR ENGAGEMENT बदलामीवर येणे. To DENY FLATLY साफ नाही ह्मणणे, वाटाण्याची अक्षत लावणे (fig.), निझाडा देणें (R.). To DENY ONE'S SELF जीव मारणे-जाळणे, इंद्रियांचे दमन करणे, इंद्रियसुखाचे नियमन करणे. ] D. v. i. to answer in the negative नकारार्थी उत्तर देणे. Deni'al, Deny'ing n. नकार m, नाकबुली f, निषेध m. Deny'ingly adv. Deni'able a. Denied pa. p. & a. Deni'er n. नाकबूल करणारा, नाकारणारा. Deobstruct (de'-ob-strukt') (L. de, & Obstruct.] v. t. अडचण दूर करणे, निर्विघ्न करणे. २(प्रवाही पदार्थाचा) मार्ग साफ-खुला करणे. Déobstruent (de-ob'stru-ent) a. med. अडचण दूर करणारा. D. n. रेचक n, रेच m, जुलाब m. Deodand (dē'o-dand) [deo dat. of deus, God; dandum, neut, of dandus, to be given from dare, to give. ] n. देवाला वाहिलेली-दिलेली वस्तु f, देवोपहार m. [झाड n. Deodar (de-o-dār' ) [cf. Sk. देवदारू.] n. देवदारूचे Deodorise (de-o-'der-iz! ) [L. de, & odor, smell. v. t. to deprive of odour resulting from impurities दुर्गधी काढून टाकणे, वाईट वास-घाण नाहींशी करणे, Deo'dorisa'tion n. Deo'dori'ser n. दुर्गेधिनाशक (द्रव्य.) Deontology (dē'-on-tol'-ō-ji) [ Gr. deon, the necessary and logos, discourse. ] n. the science of duty on moral obligation कर्तव्यशास्त्र n, धर्मशास्त्र n. (या शास्त्रांत मनुष्याची कर्तव्ये सांगितलेली असतात.) Deon'tolo'gical a. De'ontolo'gist n. कर्तव्यशास्त्रवेत्ता m